वरली मटक्यावर छापा; चौघांविरुद्ध कारवाई

By Admin | Published: June 30, 2016 12:57 AM2016-06-30T00:57:42+5:302016-06-30T00:57:42+5:30

सार्वजनिक ठिकाणी सुरू होता मटका; खामगाव पोलिसांची कारवाई.

Raid on top; Action against four | वरली मटक्यावर छापा; चौघांविरुद्ध कारवाई

वरली मटक्यावर छापा; चौघांविरुद्ध कारवाई

googlenewsNext

खामगाव : सार्वजनिक ठिकाणी वरली मटका नावाचा जुगार खेळणार्‍या चौघांविरुद्ध शहर पोलिसांनी बुधवारी कारवाई केली आहे.
शहरातील अकोला बाजार भागात रामचंद्र रज्जू बशिरे (वय ५८) व किशोर परमेश्‍वर बारस्कर (वय २६) दोघे रा. शिवाजीनगर हे बुधवारी दुपारच्या सुमारास वरली मटका जुगारावर आकडे लिहिताना दिसले. त्यांच्याजवळून नगदी व साहित्य असा ८६0 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दुसर्‍या घटनेत बुलडाणा अर्बन बँकेसमोर विनोद रमेश रामसे (वय ३२) व सुनील प्रकाश गवई (वय २५) दोघे रा. गोपाळनगर हे दुपारच्या सुमारास वरली मटका खेळताना मिळून आले. त्यांच्याजवळून नगदी व साहित्य असा ५२0 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर याच ठिकाणी राजू सहदेव पाटील (वय ३५) रा.पिंप्री, परमेश्‍वर सुहास सनान्से (वय ३0) रा.पारखेड यांनाही वरली मटका खेळताना पकडून त्यांच्याजवळून नगदी व साहित्य असा १८0 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरातील आत्मशक्ती लॉजसमोर प्रभुआप्पा परघरमोर (वय ५३) रा. हिवरखेड व मोहन देवीदास सरकार (वय ४७) रा. मोक्ता कोक्ता हे दोघे दुपारच्या सुमारास वरली मटका नावाचा जुगार खेळताना शहर पोलिसांना मिळून आले. त्याच्याजवळून नगदी व साहित्य असा एकूण २00 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उपरोक्त आरोपींविरुद्ध शहर पोलीस स्टेशनमध्ये कलम १२ (अ) मुंजुकानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Raid on top; Action against four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.