एशियाड बसच्या भाड्यातून प्रवाशांची लूट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:32 AM2017-09-21T00:32:08+5:302017-09-21T00:32:36+5:30
बुलडाणा : एस.टी. महामंडळाच्यावतीने एशियाड बस सुरू करण्यात आल्या होत्या. या बसचे भाडे हे साधारण बसपेक्षा कितीतरी जास्त आहे; मात्र या बसमध्ये कोणत्याही अतिरिक्त सुविधा नसून, बस भंगार झाल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : एस.टी. महामंडळाच्यावतीने एशियाड बस सुरू करण्यात आल्या होत्या. या बसचे भाडे हे साधारण बसपेक्षा कितीतरी जास्त आहे; मात्र या बसमध्ये कोणत्याही अतिरिक्त सुविधा नसून, बस भंगार झाल्या आहेत.
प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्याकरिता एसटी महामंडळाच्यावतीने एशियाड बस सुरू करण्यात आली. यामध्ये साधारण बसच्या तुलनेत बसण्याकरिता सिटवर वेगळे कुशन तसेच हात ठेवण्याकरिता हॅण्डल, अन्य बसच्या तुलनेत कमी थांबे देण्यात येत होते. त्यामुळे या बसचे भाडे साधारण बसच्या तुलनेत वाढविण्यात आले. साधारण बसचे भाडे प्रती स्टेज (सहा किमीची एक स्टेज) ८ रुपये ३0 पैसे आकारण्यात येते तर एशियाड बसचे भाडे प्रती स्टेज ६.६0 पैसे आकारण्यात येते. एशियाड बसच्या भाड्यात प्रती स्टेज ३0 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे बुलडाणा ते खामगाव पन्नास किमीच्या अंतरावर प्रवाशांना साधारण बसच्या तुलनेत २३ रुपये अधिक द्यावे लागतात. तर बुलडाणा अकोला या १00 किमीच्या अंतरावर प्रवास करण्याकरिता प्रवाशांना साधारण बसच्या तुलनेत ४२ रुपये अधिक द्यावे लागतात. १00 किमीच्या प्रवासाकरिता ४२ रु पये जास्त दिल्यानंतर एशियाड बसमध्ये कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसतात तर उलट या बस भंगार झाल्या आहेत. बसमधील कुशन फाटले असून, सिट तुटल्या आहे त. एकाही बसमध्ये हात ठेवण्याकरिता असलेले हॅण्डल बरोबर नाही.
या बसचे साधारण बसप्रमाणेच सर्व थांबे आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेचीही बचत होत नाही. कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त सुविधा नसताना वेळेचीही बचत होत नसल्यामुळे प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे का घेण्यात येतात, असा प्रश्न उ पस्थित होत आहे.
एशियन गेमवरून पडले एशियाड नाव
१९८२ साली भारतात एशियन स्पर्धा झाल्या होत्या. या स्पर्धेत संपूर्ण आशिया खंडातील खेळाडू सहभागी झाले होते. या खेळाडूंना मैदान ते निवास व्यवस्था तसेच विविध शहरातील मैदानांवर ने-आण करण्याकरिता काही बस तयार करण्यात आल्या होत्या. नंतर या बस महाराष्ट्रात एस टी महामंडळाला देण्यात आल्या. एशियन स्पर्धेपासून या बस देण्यात आल्यामुळे बसला एशियाड बस असे नाव पडले.
एशियाड बसमध्ये कोणत्याही अतिरिक्त सुविधा न देता जास्त भाडे आकारून प्रवाशांची लूटच करण्यात येत आहे. बसमध्ये बसल्यावर प्रवाशाला आपण एशियाड बसमध्ये असल्याचे कळते व त्याची फसवणूक होते. या बसचे भाडेही साधारण बस प्रमाणेच करायला हवे.
- विनय इसोकार, अध्यक्ष, प्रवासी संघटना, बुलडाणा
एशियाड बसमध्ये सिटला कुशन बसविण्यात आले आहेत. तसेच या बसमध्ये उभ्याने प्रवाशांना प्रवास करू दिल्या जात नाही. आरामदायी प्रवास व्हावा, याकरिता या बस तयार करण्यात आल्या आहेत. राज्यभर अशाप्रकारे एशियाड बस धावत आहेत.
- दीपक साळवे, स्थानक प्रमुख, बुलडाणा बसस्थानक.