रेल्वे प्रवाशांना दिली जाते पर्यटनस्थळांची माहिती, बॅगेवर लोणारचेही आकर्षण

By ब्रह्मानंद जाधव | Published: August 24, 2023 04:23 PM2023-08-24T16:23:22+5:302023-08-24T16:26:28+5:30

महाराष्ट्राला समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि पौराणिक अशी पार्श्वभूमी लाभलेली आहे.

Railway passengers are given information about tourist spots, also the attraction of lonar bag | रेल्वे प्रवाशांना दिली जाते पर्यटनस्थळांची माहिती, बॅगेवर लोणारचेही आकर्षण

रेल्वे प्रवाशांना दिली जाते पर्यटनस्थळांची माहिती, बॅगेवर लोणारचेही आकर्षण

googlenewsNext

लोणार : रेल्वेतून दररोज देश-विदेशातील लाखो पर्यटक-प्रवासी प्रवास करतात. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या पर्यटकांना राज्यातील पर्यटनस्थळांची माहिती होण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन संचालनालय आणि भारतीय रेल्वे यांनी पर्यटनस्थळांची छायाचित्रे असलेली आकर्षक बॅग तयार केली असून, ती रेल्वेत प्रवाशांना दिली जाते. त्या बॅगवरून लोणार सरोवरासह पर्यटनस्थळांचा प्रसार करण्यात येत आहे.

महाराष्ट्राला समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि पौराणिक अशी पार्श्वभूमी लाभलेली आहे. त्यामध्ये अजिंठा आणि एलोरा लेणी, लोणारमधील प्राचीन दैत्यसूदन मंदिर, शेकडो वर्षांपासून अखंड प्रवाहित होणारी धार, वैशिष्ट्यपूर्ण खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. नैसर्गिक सौंदर्यासाठी लोकप्रिय असलेली पर्यटनस्थळे, खाद्यपदार्थ, पाक संस्कृती, राज्यात साजरे होणारे सण यांची सर्व माहिती रेल्वेतून प्रवास करणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांना आणि प्रवाशांना होण्यासाठी प्रवासादरम्यान रेल्वेकडून दिल्या जाणाऱ्या अंथरुणासोबत एक सुंदर बॅग कोल्हापूर येथील विनायक जोशी यांनी तयार केली आहे.

ही बॅग प्रवाशांच्या हातात पडल्यानंतर या बॅगवर असलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरून चॅट केल्यावर पर्यटकांना इंग्रजी आणि मराठी या दोन भाषेत राज्यातील प्रसिद्ध शहरे, प्रमुख पर्यटनस्थळे, पाक संस्कृती, राज्यात साजरे होणारे सण यांची सखोल माहिती सहज उपलब्ध होत आहे. प्रवासादरम्यान पर्यटक चॅटद्वारे महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळांची माहिती आणि छायाचित्रे, महत्त्वपूर्ण विवरणे,आणि सूचना मिळवू शकतात.

प्रमुख पर्यटनस्थळांची सूची
मुंबई : भारतीय फिल्म उद्यान, गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, चौपाटी बीच, सिडनी पॉइंट, मरीन ड्राइव, श्रीसिद्धिविनायक मंदिर, हाजी अली दरगाह इत्यादी.
पुणे : शनिवारवाडा, आगाखान पॅलेस, पाटा गणपती, राजगड किल्ला, सिंहगड किल्ला.
नाशिक : त्र्यंबकेश्वर, सुलतानपूर, पंचवटी, सोमेश्वर, गंगापूर.
कोल्हापूर : महालक्ष्मी मंदिर, पंढरपूर, ज्योतिबा फुलोरी, इत्यादी.
महाबळेश्वर : पांडवी लेणी, वाज्राई वाट, कृष्णाई जलप्रपात, महाबळेश्वर मंदिर.
छत्रपती संभाजीनगर : घृष्णेश्वर, एलोरा गुहा, बिबी का मकबरा, पाणचक्की, चारमीनार इत्यादी.

नैसर्गिक सौंदर्य :
अलिबाग, गणपतीपुळे आणि तारकर्ली यांसारख्या नयनरम्य पश्चिम घाटापासून ते विस्तीर्ण किनाऱ्यावरील मूळ समुद्रकिनाऱ्यांपर्यंत, महाराष्ट्र वैविध्यपूर्ण निसर्गदृश्ये प्रदान करतो. महाबळेश्वर आणि माथेरानसारखी हिल स्टेशन्स उन्हाळ्याच्या उष्णतेपासून थंड माघार देतात आणि आजूबाजूच्या खोऱ्यांचे विहंगम दृश्य देतात.

Web Title: Railway passengers are given information about tourist spots, also the attraction of lonar bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.