रेल्वेमार्ग विदर्भ-मराठवाडाच्या विकासाचा लोहमार्ग ठरावा : खा. प्रतापराव जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:29 AM2021-01-09T04:29:02+5:302021-01-09T04:29:02+5:30
दीर्घ काळापासून प्रस्तावित असलेल्या खामगाव-जालना रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी मध्य रेल्वे सुरक्षा समितीचे उपमुख्य प्रबंधक सुरेश जैन यांच्यासह पाच सदस्यांचे पथक ...
दीर्घ काळापासून प्रस्तावित असलेल्या खामगाव-जालना रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी मध्य रेल्वे सुरक्षा समितीचे उपमुख्य प्रबंधक सुरेश जैन यांच्यासह पाच सदस्यांचे पथक जालना येथील सर्वेक्षणानंतर ७ जानेवारी चिखलीत दाखल झाले होते. या पथकाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात स्थानिक लोकप्रतिनिधी, व्यापारी, उद्योजक, पत्रकार आणि नागरिकांशी संवाद साधला. यावेळी खा. प्रतापराव जाधव, माजी मंत्री भारत बोंद्रे, माजी आ. राहुल बोंद्रे, सिंदखेड राजाचे माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा. नरेंद्र खेडेकर, बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर सुरुशे, उपसभापती राजीव जावळे, सचिन बोंद्रे, अडत व्यापारी संघटनेचे शिवाजी देशमुख, हमाल संघटनेचे अध्यक्ष गजानन पवार, सूर्यकांत मेहेत्रे आदींनी रेल्वे समितीकडे आपल्या सूचना व मागण्या मांडल्या. राहुल बोंद्रे यांनी औद्योगिक व शैक्षणिक फायद्यांबाबत माहिती दिली, प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने या रेल्वेमार्गाची गरज विशद केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र तोडकर, शंतनू बोंद्रे, शिवसेना शहरप्रमुख श्रीराम झोरे, नीलेश अंजनकर, बाजार समिती संचालक काशिनाथ बोंद्रे, स्वाभिमानीचे विनायक सरनाईक, शैलेश बाहेती, राजेंद्र व्यास, नंदू कऱ्हाडे, रेल्वे लोकआंदोलन समितीचे संतोष लोखंडे, अनुप महाजन, भारत दानवे, कैलास शर्मा आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रेणुकादास मुळे तर आभार डॉ. किशोर वळसे यांनी मानले. रेल्वे समितीने स्थानिक एमआयडीसी परिसराची पाहणी करून माहिती संकलित केली.
सकारात्मक अहवाल पाठवणार - सुरेशचंद्र जैन
सर्वेक्षण पथकातील अधिकारी सुरेशचंद्र जैन यांनी उपस्थितांच्या अपेक्षा, सूचना व मागण्या जाणून घेतल्या. त्यानंतर औद्योगिकीकरणाला असलेला वाव आणि येथील शेतमालाला दूरपर्यंत असलेली मागणीची दखल घेत मध्य रेल्वेकडे सादर करण्यात येणारा सर्वेक्षण अहवाल हा निश्चितच सकारात्मक असेल, अशी ग्वाही जैन यांनी याप्रसंगी दिली.