पावसामुळे भिंत पडली; युवक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 06:22 PM2019-09-09T18:22:48+5:302019-09-09T18:23:04+5:30
पावसामुळे घराची भिंत कोसळून एक युवक जखमी झाला.
रविवारी मध्यरात्री घडली घटना: सुदैवाने जिवीत हानी नाही
चांडोळ: बुलडाणा तालुक्यातील धाड नजीक असलेल्या चांडोळ येथे येथे रविवार जोरदार पावसामुळे घराची भिंत कोसळून एक युवक जखमी झाला. दरम्यान, सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवीत हानी झाली नाही. दरम्यान, भिंतीच्या मलब्याखाली दबलेल्या अरुण देशमुख यास नागरिकांनी त्वरेने बाहेर काढल्याने मोठी अनुचीत घटना टळली.
रविवारी मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे चांडोळ येथील भुजंगराव देशमुख व शेख बशीर यांच्या घराची सामायिक भिंत रात्री अचानक पडली. यावेळी मोठा आवाज झाल्याने त्यांचे शेजारी झोपेतून जागे झाले. घडलेल्या संपूर्ण प्रकार निदर्शनास आल्यास भिंतीखाली दबलेल्या अरुण देशमुख या युवकास मोठे कसब दाखवत नागरिकांनी बाहेर काढले. या भिंतीच्याच शेजारी असलेल्या पलंगावर अरुण देशमुख व बाजूला त्याचे वडील भुजंगराव देशमुख सुद्धा झोपले होते. भिंत पडल्याने अरुण भिंतीच्या मलब्याखाली दबला होता. त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले असले तरी त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. भिंत पडल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेचा पंचनामा तलाठी देठे व कोतवाल जितेश राऊत यांनी करीत बुलडाणा तहसिल कार्यालयास अहवाल पाठविला आहे. दरम्यान, नुक
तसेच घरातील भिंतीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे पडलेल्या भिंतीचा पंचनामा तलाठी देठे व कोतवाल जितेश राऊत यांनी केले असून त्याचा अहवाल बुलडाणा तहसीलदार यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त कुटुंबियांना शासनाने त्वरेने मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.