जिल्ह्यात पावसाची संततधार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:22 AM2017-08-21T00:22:02+5:302017-08-21T00:30:53+5:30
बुलडाणा: मागील चार आठवड्यांपासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवार रात्रीपासून जिल्ह्यात कमी-जास्त प्रमाणात हजेरी लावली आहे. या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले असून, शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची नोंद सरासरी २४.६ मि.मी. करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: मागील चार आठवड्यांपासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवार रात्रीपासून जिल्ह्यात कमी-जास्त प्रमाणात हजेरी लावली आहे. या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले असून, शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची नोंद सरासरी २४.६ मि.मी. करण्यात आली आहे.
जिल्ह्यात मागील चार आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिकांनी माना टाकायला सुरुवात केली होती. तर अनेक ठिकाणच्या पिकांचे पावसाअभावी उत्पादनात घट होणार आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पावसाने सुरुवात केली आहे. या पावसामुळे काही पिकांना जीवनदान मिळणार असून, अनेक प्रकल्प परिसरातील उन्हाळ्यातील पिण्याचा पाण्याची समस्या दूर होणार आहे. यावर्षी पावसाळा सुरू झाल्यानं तर आजपर्यंत सरासरी ४५७.४ मि.मी. पाऊस झाला असून, शनिवारी रात्री ते रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २४.६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यात बुलडाणा तालुक्यात ३९.0 मि.मी., चिखली १८.0, देऊळगाव राजा २२.0, मेहकर २७.0, लोणार २0.0, सिंदखेड राजा १९.८, मलकापूर ३६.0, नांदुरा ३0.0, मोताळा ४५.0, खामगाव १९.४, शेगाव २३.0, जळगाव जामोद ११.0, संग्रामपूर तालुक्यात ८.0 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.
पावसाचा पोळ्याचा बाजारावर परिणाम
बुलडाणा: शहराचा आठवडी व पोळ्याचा बाजार २0 ऑगस्ट रोजी येथील जयस्तंभ चौक परिसरात भरला होता. यावेळी ग्रामीण भागातील नागरिकांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती; मात्र सकाळपासून रिमझिम व संततधार पावसामुळे अनेक व्यापारी व भाजीपाला विक्रेत्यांची धावपळ झाली. अनेकांना बसण्यासाठी जागा मिळाली नाही.