महादेवाच्या मंदिराला पावसामुळे गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:37 AM2021-08-23T04:37:03+5:302021-08-23T04:37:03+5:30
धोत्रा नंदईा येथील महादेव मंदिरात श्रावण महिन्यात भाविकांची गर्दी असते. या गावात तीन पुरातन मंदिर आहेत. भल्यामोठ्या दगडात बारीक ...
धोत्रा नंदईा येथील महादेव मंदिरात श्रावण महिन्यात भाविकांची गर्दी असते. या गावात तीन पुरातन मंदिर आहेत. भल्यामोठ्या दगडात बारीक काम केले असून हे मंदिर तयार करण्यात आले आहे. महादेवाचे मंदिर सतराव्या शतकातील राजा मोहन राॅय यांच्या पंडिताने बांधकामाचा मानस केला होता, आकाराने मोठ्या असलेल्या एका दगडांमध्ये कोरीव काम करून हेमाडपंथी मंदिर बनवण्यात आले. मंदिरात आत जाण्यासाठी एक मार्ग असल्याने दर्शनानंतर भाविकांना याच मार्गाने परत यावे लागते. गोल घुमट असलेल्या मंदिरात नेहमी अंधार असतो, आतमध्ये एक छोटासा दगडाचा दिवा आहे आणि सूर्यकिरणांनी त्यावर प्रकाश पडतो. मंदिर पश्चिम दिशेला असून उजव्या बाजूला एक छोटीशी बारव आहे. या परिसरात महादेवाचे एकमेव मंदिर असल्याने भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. पुरातन विभागाचे दुर्लक्ष झाल्याने मंदिराचे वैभव धोक्यात आले आहे.
मंदिरातच साचते पाणी
मंदिरात पाणी साचत असल्याने भाविकांना अडचणीचे होते. श्रावण महिन्यात दर सोमवारी भाविक दर्शनासाठी मंदिरात येतात. परंतु मंदिरात पाणी जमत असल्याने भाविकांची गैरसाेय होते.