वादळी वाऱ्यासह पाऊस; टीनपत्रे उडाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 11:25 AM2021-05-29T11:25:43+5:302021-05-29T11:25:50+5:30

Khamgaon News : शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्यादरम्यान जोरदार वादळी वाºयासह पाऊस झाला.

Rain with force winds; Tinplate blown in khamgoan | वादळी वाऱ्यासह पाऊस; टीनपत्रे उडाली

वादळी वाऱ्यासह पाऊस; टीनपत्रे उडाली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : खामगाव शहरासह ग्रामीण भागात शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्यादरम्यान जोरदार वादळी वाºयासह रिमझिम पाऊस झाला. या वाऱ्यामुळे टिनपत्रे उडाली असून, अतिक्रमीत जागेतील काही दुकानेही रस्त्यावर पडली. 
शुक्रवारी दिवसभर कडक उन्ह  असतांनाच ४ वाजताच्यादरम्यान अचानक जोरदार वादळी-वारा सुरू झाला. त्यामुळे घरावरील टिनपत्रे उडाली. तसेच बसस्थानक ते नांदुरा मार्गावरील जलंब नाक्याजवळ रस्त्याच्या कडेला अतिक्रमित जागेवर असलेली टपराची दुकाने उलटून रस्त्यावर पडली. यादरम्यान काही वेळाकरिता वाहतूक विस्कळीत झाली होती. लॉकडाऊनमुळे सर्व दुकाने बंद असल्याने अनर्थ टळला. सायंकाळी ४.३० वाजताच्यादरम्यान रिमझिम पाऊस झाला. नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने रस्त्यावर पडलेली दुकाने बाजुला केली. त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली.

शहरातील वीजपुरवठा खंडीत
शुक्रवारी सायंकाळी वादळी वारा सुरू होताच वीजपूरवठा खंडीत झाला. शहरातील बसस्थानक परिसर, वाडी, तायडे कॉलनी, अग्रसेन चौक परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला. उशीरापर्यंत वीजपूरवठा सुरळीत झाला नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. वारंवार वीज पुरवठाही या कालावधीत खंडीत होत होता.


वरवट बकाल परिसरात जोरदार पाऊस
शुक्रवारी दुपारच्या सुमारास संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल परिसरातही जोरदार पाऊस झाला. जवळपास अर्धा तास पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. पावसामुळे नुकसान झाल्याची नोंद महसूल विभागाकडे नाही.
 

Web Title: Rain with force winds; Tinplate blown in khamgoan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.