पावसाने सरासरी गाठली!
By admin | Published: July 4, 2016 01:36 AM2016-07-04T01:36:39+5:302016-07-04T01:36:39+5:30
बुलडाणा जिल्ह्यात सरासरी १३७.४ मि.मी पावसाची नोंद.
बुलडाणा : गेल्या चार दिवसांत जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला. जून महिन्यात पाऊस लांबणीवर पडल्यामुळे सर्वांची चिंता वाढली होती. मात्र, गत आठवड्याभरात जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली. गतवर्षी ३ जुलैपर्यंत सरासरी ११६ मि.मी पाऊस होता, तर यंदा आजपर्यंत सरासरी १३७.४ मि.मी पावसाची जिल्ह्यात नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील तेराही तालुक्यात १ जून ते ३ जुलैपर्यंत १७८६ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे. ज्याची सरासरी १३७.४ एवढी आहे. ३ जुलै रोजी जिल्ह्यात १७३ मि.मी पावसाची नोंद असून, ज्याची सरासरी १३.४ मि.मी आहे. यात बुलडाणा तालुक्यात १५.मि.मी, चिखली १ मि.मी, लोणार २५ मि.मी, मलकापूर ३ मि.मी, मोताळा १९ मि.मी, नांदुरा ५१ मि.मी, खामगाव ३२ मि.मी, शेगाव २0 मि.मी, जळगाव ज.२ मि.मी, संग्रामपूर ५ मि.मी पावसाची नोद असून, देऊळगाव राजा, मेहकर, सिंदखेड राजा हे तीन तालुके निरंक आहेत.