पावसामुळे नऊ रस्त्यांवरील वाहतूक प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:41 AM2021-09-08T04:41:51+5:302021-09-08T04:41:51+5:30

जामनेर-फत्तेपूर-मोताळा-तरवाडी-फाटा-पिंपळगाव राजा-खामगाव रस्ता चार तास बंद होता. शेंबा-कोथळी-तरोडा हा रस्ताही बंद होता. दाताळा-गिरडा हा रस्ता सोडतीन तास बंद होता. ...

The rains affected traffic on nine roads | पावसामुळे नऊ रस्त्यांवरील वाहतूक प्रभावित

पावसामुळे नऊ रस्त्यांवरील वाहतूक प्रभावित

Next

जामनेर-फत्तेपूर-मोताळा-तरवाडी-फाटा-पिंपळगाव राजा-खामगाव रस्ता चार तास बंद होता. शेंबा-कोथळी-तरोडा हा रस्ताही बंद होता. दाताळा-गिरडा हा रस्ता सोडतीन तास बंद होता. गिरडा-जामठी-धाड हा रस्ताही पुराच्या पाण्यामुळे साडेचार तास बंद होता. बुलडाणा-सागवण-नांद्राकोळी, सैलानी हा रस्ता तब्बल सहा तास बंद होता. मोताळा-जयपूर हा रस्ता पाच तास बंद होता. यासह अन्य काही छोटे-मोठे रस्ते बंद होते. दरम्यान, सायंकाळी काही मार्गांवर वाहतूक सुरू झाली आहे.

--दोन प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग--

जिल्ह्यातील गेट असलेल्या चार प्रकल्पांपैकी खडकपूर्णा प्रकल्पाचे ७ गेट २० सेमीने उघडण्यात आले असून, त्यातून ५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे तर मन प्रकल्पाचेही ४ गेट २० सेमीपर्यंत उघडण्यात आले असून, त्यातूनही मोठ्या प्रमाणावर विसर्ग होत आहे. दरम्यान, या संततधार पावसामुळे नळगंगा प्रकल्पही ५० टक्क्यांपेक्षा अधिक भरला आहे.

Web Title: The rains affected traffic on nine roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.