पावसामुळे सोयाबीन पिकाला कोंब फुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:38 AM2021-09-27T04:38:04+5:302021-09-27T04:38:04+5:30
या वर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पेरणीला अमडापूर व परिसरात शेतकऱ्यांनी पसंती देऊन बँक खासगी कर्ज घेऊन महागडे बी-बियाणे, खते ...
या वर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पेरणीला अमडापूर व परिसरात शेतकऱ्यांनी पसंती देऊन बँक खासगी कर्ज घेऊन महागडे बी-बियाणे, खते विकत घेऊन पेरणी केलेली आहे. यावर पहिलेच मोठ्या प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव असल्याने, शेतकऱ्यांना दोन-चार वेळा महागडे औषध घेऊन फवारणी करावी लागली आहे. आता सोयाबीन पीक काढणीला आलेले असताना, पाऊस सतत सुरू असल्याने, काही शेतातील सोयाबीन पीक पाण्याखाली गेले आहे, तर काही ठिकाणी सोयाबीन पिकाला कोंब फुटले आहेत. अशा परिस्थितीमध्ये पहिले शेतकऱ्यांवर कर्ज, यातच सोयाबीन पिकाची नासाडी होताना दिसत आहे. यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. त्याचप्रमाणे, सोयाबीनच्या पाठोपाठ काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे उडीद हे पीकही पावसामुळे शेतातच नाश झाले आहे, तर या झालेल्या नुकसानीची पाहणी करून योग्य ती भरपाईची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.