पावसाने शेती खरडली, मदतीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:35 AM2021-07-30T04:35:50+5:302021-07-30T04:35:50+5:30
बेपत्ता मुलींच्या शोधकार्यात अडचणी बुलडाणा : बेपत्ता, अपहरण झालेल्या मुली कधीही लपून किंवा काेणाला न सांगता जात नाहीत. अल्पवयीन ...
बेपत्ता मुलींच्या शोधकार्यात अडचणी
बुलडाणा : बेपत्ता, अपहरण झालेल्या मुली कधीही लपून किंवा काेणाला न सांगता जात नाहीत. अल्पवयीन असल्याने त्यांना तेवढी समज नसते. परंतु ज्यांना सांगून जातात, ते घाबरत असल्याने सांगण्यास टाळाटाळ करतात. यामुळे तपास कार्यात अडचणी येतात. तसेच अनेक मुली परत आल्यानंतर पाेलीस स्टेशनला माहिती देत नाहीत.
रेनवॉटर हार्व्हेस्टिंग राबविण्याची मागणी
बुलडाणा : रेनवॉटर हार्व्हेस्टिंगबाबत जनजागृतीचा अभाव आहे. पाणीटंचाईचा सामना करताना भूजलाचा उपसा करण्याऐवजी पाणीटंचाई नसताना भूजलाची पातळी वाढवण्यासाठी प्रत्येक मालमत्तेवर रेनवॉटर हार्व्हेस्टिंग राबविणे महत्त्वाचे आहे, असे मत जलतज्ज्ञांनी व्यक्त केले.
कर्जाची परतफेड कशी करावी?
बीबी : लॉकडाऊनमध्येही मायक्रो फायनान्सची वसुली जोमात सुरूच आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात कर्जाची परतफेड कशी करावी? असा प्रश्न कर्ज घेणाऱ्यांना पडला आहे. ही वसुली थांबविण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे.
धामण नदीवरील पुलाला कठड्याची प्रतीक्षा
बुलडाणा : गेल्या काही वर्षांपासून, विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या धामणगाव ते पारध रस्त्यावरील धामणा नदीवरील पुलाला संरक्षण कठडे नसल्याने अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे या पुलांवर कठडे लावण्याची मागणी होत आहे. पावसाळ्यात या पुलावर अपघात हाेण्याची शक्यता आहे.
काेराेनामुळे अनेकांचा मानसिक ताण वाढला
बुलडाणा : गत वर्षभरापासून जिल्ह्यात काेराेनाने थैमान घातले आहे. काेराेना राेखण्यासाठी लावलेल्या निर्बंधांमुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले असून, बहुतांश जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तसेच मानसिक ताण वाढत आहे.
शेतकरी फळबाग याेजनेपासून वंचित
मोताळा : गेल्या दोन वर्षांपासून केवळ पंचायत समितीच्या चालढकल कारभारामुळे तालुक्यातील हजारो शेतकरी शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.