पावसाळ्याच्या दिवसात अरुंद रस्ते ठरताहेत कर्दनकाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:39 AM2021-08-21T04:39:22+5:302021-08-21T04:39:22+5:30

बुलडाणा: जिल्ह्यात यावर्षीच्या अपघातांमध्ये मृत्यू होणाऱ्यांची संख्या मागील महिन्यातच शतकापार गेली होती. त्यामध्ये आता तढेगाव येथील अपघाताने आणखी भर ...

On rainy days, narrow roads become Kardankal! | पावसाळ्याच्या दिवसात अरुंद रस्ते ठरताहेत कर्दनकाळ!

पावसाळ्याच्या दिवसात अरुंद रस्ते ठरताहेत कर्दनकाळ!

Next

बुलडाणा: जिल्ह्यात यावर्षीच्या अपघातांमध्ये मृत्यू होणाऱ्यांची संख्या मागील महिन्यातच शतकापार गेली होती. त्यामध्ये आता तढेगाव येथील अपघाताने आणखी भर घातली आहे. गेल्या सात महिन्यात २०० पेक्षा अधिक अपघात झाले असून, त्यामध्ये एकूण मृत्यूची संख्या ११३ आहे. पावसाळ्याच्या दिवसात अरुंद रस्ते वाहनचालकांसाठी कर्दनकाळ ठरत असल्याचा प्रत्यय समोर येत आहे. पावसाळ्यात घडणारे सर्वाधिक अपघात हे रस्त्यावरील खड्डे, चिखलमय रस्ते, खड्ड्यात पावसाचे पाणी साचून खड्ड्याचा अंदाज न येणे आदी कारणांमुळे होतात. सिंदेखड राजा तालुक्यातील तढेगाव येथील भीषण अपघाताने रस्ते व बांधकाम विभागाची झोप उडवली आहे. या अपघाताने आता सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस, वाहतूक शाखेसह सर्वच यंत्रणांचे लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यातील अरूंद रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनत आहे. समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना दोन्ही वाहनांना आपले वाहन रस्त्याच्या खाली टाकावेच लागते. पावसाळ्याच्या दिवसात हे अरूंद रस्तेच मोठ्या अपघातासाठी कारणीभूत ठरतात. जिल्ह्यात आतापर्यंत २०० अपघात झालेले आहेत. त्यामध्ये ११३ मृत्यू झालेले आहेत. तढेगाव येथील अपघातातील मृत्यूची संख्या आतापर्यंतच्या अपघातापैकी सर्वाधिक आहे.

वाहन रस्त्याच्या खाली टाकावे की नाही?

पावसाळ्याच्या दिवसात अरूंद रस्त्याने वाहन चालविणे म्हणजे तारेवरची कसरतच. त्यात समोरून एखादे वाहन आले, तर वाहन रस्त्याच्या खाली टाकावे की नाही? हाच मोठा प्रश्न या वाहनचालकांसमोर उपस्थित होत आहे. वाहन रस्त्याच्या बाजूला टाकले, तर रस्त्यांच्या कडा खचून वाहन पलटी होण्याचा धोका अधिक असतो. तढेगाव येथील या अपघाताने आता या रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांनी धास्ती घेतली आहे.

पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेक रस्ते हे चिखलमय झालेले आहेत. त्यात अरूंद रस्ते असतील, तर त्या रस्त्यावरून वाहन घसरण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे वाहनचालकांनी अशा रस्त्याने वाहन चालविताना वाहनाचा वेग कमीच ठेवावा. समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना रस्त्याची रुंदी बघावी, जेणेकरून आपले वाहन रोडच्या खाली जाणार नाही.

एन. एम. परदेसी, जिल्हा वाहतूक अधिकारी बुलडाणा.

१०२२

साडेतीन वर्षातील अपघातातील मृत्यू

जिल्ह्यातील रस्ते अपघात

वर्ष अपघात जखमी मृत्यू

२०१८ : ६४८ ६२८ ३०४

२०१९: ५७२ ४२१ ३१९

२०२०: ५२९ ३३८ २९९

२०२१: २०० १२९ ११३

Web Title: On rainy days, narrow roads become Kardankal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.