रायपुरात १४ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:29 AM2021-01-13T05:29:19+5:302021-01-13T05:29:19+5:30
रायपूर ग्रा.पं.मध्ये ५ वाॅर्ड असून प्रत्येक वाॅर्डात वेगवेगळ्या आरक्षणाच्या ३ जागा आहे. वाॅर्ड क्र.१ मध्ये ओबीसी स्री, सर्वसाधारण महिला, ...
रायपूर ग्रा.पं.मध्ये ५ वाॅर्ड असून प्रत्येक वाॅर्डात वेगवेगळ्या आरक्षणाच्या ३ जागा आहे. वाॅर्ड क्र.१ मध्ये ओबीसी स्री, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण यासाठी उमेदवार उभे आहे. वाॅर्ड क्र.२ मध्ये एससी महिला, सर्वसाधारण महिला, ओबीसी पुरुष या जागेसाठी १० उमेदवार उभे आहे. वाॅर्ड क्र.३ मध्ये ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, ओपन पुरुष या जागांसाठी ८ उमेदवार आहे. वाॅर्ड क्र.४ मध्ये ओबीसी महिला, सर्वसाधारण पुरुष, सर्वसाधारण महिला, वाॅर्ड क्र.५ मध्ये एससी पुरुष, ओपन महिला या वाॅर्डातून सर्वसाधारण जागेवर सुनील देशमाने अविरोध निवडून आले आहे. ग्रामपंचायतची सदस्य संख्या १५ आहे. एक जागा अविरोध झाल्यामुळे चौदा जागांसाठी निवडणूक होत आहे. रायपूर येथे दोन पॅनल निवडणूक लढत असून ३ उमेदवार अपक्ष निवहणूक लढत आहे. सरपंच पदाचे आरक्षण निवडणूक निकालानंतर होणार आहे. सरपंच पदाचे उमेदवार सरपंचपदाचा दावा ठोकताना दिसत आहे. सर्वच उमेदवार मतदारांच्या घरी जाऊन मतदारांची मनधरणी करीत असून विकासाची आश्वासने देताना दिसत आहेत.