शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन उभारणार : तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:23 AM2021-06-21T04:23:05+5:302021-06-21T04:23:05+5:30

चिखली : बोगस बियाणे, खतांची दरवाढ, पीकविमा यांसह शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांवर येत्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक आंदोलन करणार ...

To raise agitation on farmers' issues: Tupkar | शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन उभारणार : तुपकर

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन उभारणार : तुपकर

Next

चिखली : बोगस बियाणे, खतांची दरवाढ, पीकविमा यांसह शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांवर येत्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक आंदोलन करणार आहे. संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी मैदानात उतरून लढण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी रविवारी चिखली तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक रविकांत तुपकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. संघटनेच्या आगामी काळातील वाटचाल, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. रविकांत तुपकर यांनी पदाधिकाऱ्यांच्या सूचना, संघटना व शेतकऱ्यांच्यास समस्या यांबाबतची भूमिका यावेळी जाणून घेतली. चिखली तालुक्यात आणि जिल्ह्यात गाव तेथे 'स्वाभिमानी'ची शाखा स्थापन करण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला. दरम्यान, गावोगावी संघटन वाढवून आगामी नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचनाही रविकांत तुपकर यांनी यावेळी दिल्या. कोरोनाकाळात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गरजूंना केलेली मदत, रुग्ण व त्यांच्या नातलगांना दिलेल्या सेवाकार्याबद्दल तुपकरांनी पदाधिकाऱ्यांचे कौतुकदेखील केले. बैठकीला राणा चंदन, भगवानराव मोरे, नितीन राजपूत, विनायक सरनाईक, भारत वाघमारे, पवन देशमुख, मयूर बोर्डे, अंकुश सुसर, रामेश्वर अंभोरे, अनिल वाकोडे, अनिल चव्हाण, अमोल मोरे, संतोष शेळके, सुधाकर तायडे, रामेश्वर परिहार, आकाश राऊत, शरद राऊत, विठ्ठल चौथे, संतोष खडसे, शुभम डुकरे, भारत खंडागळे, कार्तिक खेडेकर, रविराज टाले, अनिल खरात, दीपक धनवे, अमोल तेलंग्रे, भीमराव हिवरकर, अमोल तिडके, राधाकिसन भुतेकर, माधव रोडगे, आदी तालुक्यांतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: To raise agitation on farmers' issues: Tupkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.