शेगावात तंत्रनिकेतन उभारणार - खडसे

By Admin | Published: January 25, 2016 02:21 AM2016-01-25T02:21:47+5:302016-01-25T02:21:47+5:30

अल्पसंख्याक विकास कामासाठी बुलडणा जिल्ह्यातील चार पालिकांना दहा कोटींचा निधी.

Raising of technician at Shegaon - Khadse | शेगावात तंत्रनिकेतन उभारणार - खडसे

शेगावात तंत्रनिकेतन उभारणार - खडसे

googlenewsNext

शेगाव(जि. बुलडाणा): राज्य शासन अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध असून, बुलडाणा जिल्ह्यातील चार पालिका क्षेत्रांमध्ये असलेल्या अल्पसंख्याकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी दिला आहे. दरम्यान, शेगाव शहरातील अल्पसंख्याकांच्या मुलांसाठी स्वतंत्र तंत्रनिकेतन उभारण्यात येणार असून, शेगाव, मलकापूर, बुलडाणा आणि चिखली या चार पालिकांचे रहिवासी असलेल्या अल्पसंख्याकांच्या विकासासाठी प्रामुख्याने निधी दिला गेला असल्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी येथे स्पष्ट केले.
शेगाव येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण आणि शहरातील पावणे दोन कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी शेगावात पालकमंत्री बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत आ.डॉ. संजय कुटे, आ. पांडुरंग फुंडकर, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. आकाश फुंडकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे, नगराध्यक्ष शारदा कलोरे, उपाध्यक्ष ज्योती मुंदडा, नगरसेवक शरद अग्रवाल, राजू चुलेट, किरण देशमुख, कमलाकर चव्हाण, फहीमीदाबी, राजेंद्र वाघ, गजानन जवंजाळ, पांडुरंग बूच, मुख्याधिकारी अतुल पंत, उपविभागीय अधिकारी प्रभाकर बेंडे, तहसीलदार गणेश पवार उपस्थित होते.

Web Title: Raising of technician at Shegaon - Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.