राईतकर दांपत्य सहयोग शिक्षक परीक्षेत उत्तीर्ण - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:20 AM2021-03-29T04:20:32+5:302021-03-29T04:20:32+5:30
महिला पतंजली योग समितीद्वारा तालुक्यासाठी ऑनलाइन पद्धतीने राबवल्या गेलेल्या शिक्षक-शिक्षिका सहयोग प्रशिक्षण शिबिरामध्ये राईतकर दांपत्याने सहभाग घेतला होता. हे ...
महिला पतंजली योग समितीद्वारा तालुक्यासाठी ऑनलाइन पद्धतीने राबवल्या गेलेल्या शिक्षक-शिक्षिका सहयोग प्रशिक्षण शिबिरामध्ये राईतकर दांपत्याने सहभाग घेतला होता. हे शिबिर १ फेब्रुवारी ते १ मार्च या दरम्यान घेण्यात आले होते. यामध्ये बुलडाणा, अकोला आणि वर्धा या तीनही जिल्ह्यातील योगसाधक सहभागी झाले होते. सहयोग शिक्षक-शिक्षिका प्रशिक्षण परीक्षा ही प्रॅक्टिकल आणि लेखी स्वरूपात झाली होती. १०० गुणांच्या या परीक्षेमध्ये भगवान राईतकर यांना ८५ तर गीता राईतकर ८१ गुणांसह उत्तीर्ण झाले आहे. या सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिरामध्ये राईतकर दांपत्याला रश्मी जोशी (अकोला), सुनीता चांडक (शेगाव), प्रणिता गुल्हाने (वर्धा), नंदा सदावर्ते, विद्या पेंडके आणि सुनंदा तापडिया यांनी मार्गदर्शन केले.
सहयोग शिक्षक शिक्षिका प्रशिक्षण परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल राईतकर दांपत्याचे विद्या पडघान, रुख्मिना पागोरे, अश्विनी शिंदे, संगीता मोरे, किरण भराड यांनी अभिनंदन केले.