सिंदखेडराजातूनच विधानसभेची निवडणूक लढवणार - राजेंद्र शिंगणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 07:49 PM2018-01-21T19:49:29+5:302018-01-21T19:51:41+5:30

देऊळगांवराजा :  विरोधक वा अन्य कोणी अफवांचे पीक पसरवत असले तरीही मी राष्टÑवादी पक्षाचा निष्ठावंत आहे. आगामी विधानसभेची निवडणूक आपण सिंदखेडराजा मतदार संघातूनच लढवणार असल्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी येथे स्पष्ट केले.

Rajendra Shingane to contest from Vidyasabha election from Sindhkhedaraj | सिंदखेडराजातूनच विधानसभेची निवडणूक लढवणार - राजेंद्र शिंगणे

सिंदखेडराजातूनच विधानसभेची निवडणूक लढवणार - राजेंद्र शिंगणे

Next
ठळक मुद्देदेऊळगाव राजा येथे पार पडली राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगांवराजा :  विरोधक वा अन्य कोणी अफवांचे पीक पसरवत असले तरीही मी राष्ट्रवादी पक्षाचा निष्ठावंत आहे. आगामी विधानसभेची निवडणूक आपण सिंदखेडराजा मतदार संघातूनच लढवणार असल्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी येथे स्पष्ट केले.
रविवारी देऊळगांवराजा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आयोजित कार्यक्रमात डॉ. शिंगणे बोलत होते. कार्यक्रमाला गंगाधरराव जाधव, प्रा.दिलीप झोटे, गजानन पवार, सभापती नितीन शिंगणे, शांतीलालादादा सिंगलकर, तुकाराम खांडेभराड, कविश जिंतूरकर, कचरु सपाटे, विठ्ठल मग, नंदलाल शर्मा, बळीराम गोरे, अ‍ॅड.अर्पित मिनासे, प्रमोद वैराळकर, धनंजय मोहिते, राजु सिरसाट, बद्रीदास बैरागी, अशोक पाटील, नगरसेवक ईस्माईल बागवान, हनीफ शहा, विद्या अतिश कासारे, नवनाथ गोमधरे, गटनेता विष्णू रामाणे, अनिल रामाणे, बाळू शिंगणे, एल.एम.शिंगणे, संतोष पिंपळे, मुरलीधर कामळे, गुरुदेव भंडारी, विश्वजीत दहिवाळ, महेश देशमुख  आदींची उपस्थिती होती. ते पुढे म्हणाले की २०१४ ची निवडणूक लढवण्याचा निर्णय माझाच होता. त्याही निवडणूकीत प्रामाणिकपणे मी व माझ्या सहकाया-यांनी निष्ठेने पक्षाचेच काम केले. गेल्या साडेतीन वर्षाच्या काळात मतदार संघाकडे व माझ्या कार्यकर्त्यांकडे मी दुर्लक्ष केले नाही. पालिका बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सगळ्या निवडणूका मी गांभीर्याने घेतल्या. बाजार समिती, पंचायत समितीमध्ये स्पष्ट बहुमत आणून राष्ट्रवादीची सत्ता कायम ठेवली. जिल्हा परिषदेमध्येही राष्ट्रवादी पक्षाच्या वर्चस्वाला धक्का लागू दिला नाही. त्यामुळे सिंदखेडराजा मतदार संघात राष्ट्रवादी पक्षाची ताकद कायम असली तरी गाफील न राहता पक्षाची मजबूत बांधणी करण्यासाठी पदाधिकाºयांनी मरगळ झटकून कामाला लागा. शहरातील संपूर्ण वार्ड व गावागावात पक्षप्रमुख व त्यांची कार्यकारिणी निवडून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी तळागाळातल्या लोकांपर्यत जाऊन त्यांनंतर पक्ष प्रवाहात आणण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या.  दरम्यान, राजकारणाच्या सारीपाटावर गेल्या २३ वर्षापासून समाजकारण करत असताना सिंदखेडराजा मतदार संघातील अठरापगड जातीधर्माला सोबत ठेऊनच मी सातत्याने विकासाचे व बहुजनांच्या हितांचे कार्य केले. १९९५ पासून सलग चार वेळा मतदारांनी मला निवडून दिले, ते ऋण मी कधीच विसरु शकत नाही, असे ते म्हणाले. 
राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रामप्रसाद शेळके म्हणाले की, जातीपातीच्या राजकारणाला कधीही थारा न देता डॉ.शिंगणे यांनी राजकारण केले. त्यांच्याच काळात मतदारासंघात हरीतक्रांती झाली. आजचे सत्ताधारी न केलेल्या कामांचे श्रेय लाटत असून साडेतीन वर्ष झाली तरी विकासाची वाणवा आहे. जे सत्य आहे ते जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी कंबर कसून कामाला लागण्याचे डॉ. शेळके यांनी सांगितले. 
यावेळी शहरातील युवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतला. डॉ.शिंगणे यांच्या हस्ते शंकर शिवरकर, किशोर शिवरकर, अशोक शिवरकर, जानराव शिवरकर, सय्यद अन्सार, संजय काकडे, दिलीप आंधळे, शेख अतिक मोहम्मद जमील यांचा सत्कार करण्यात आला. संचलन शहर अध्यक्ष बद्रीदास बैरागी यांनी केले. 

Web Title: Rajendra Shingane to contest from Vidyasabha election from Sindhkhedaraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.