राजीव गांधी प्राणवायू प्रकल्प जीवनदायी ठरणार : मुकुल वासनिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:41 AM2021-08-18T04:41:28+5:302021-08-18T04:41:28+5:30
स्थानिक अनुराधा नगर परिसरात उभारण्यात आलेल्या स्व. राजीव गांधी प्राणवायू प्रकल्पाचे लोकार्पण मुकुल वासनिक यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी ...
स्थानिक अनुराधा नगर परिसरात उभारण्यात आलेल्या स्व. राजीव गांधी प्राणवायू प्रकल्पाचे लोकार्पण मुकुल वासनिक यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी पार पडले. कोविड रुग्णांप्रती असलेली काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांची तळमळ आजवर केलेल्या कार्याचे वासनिकांनी यावेळी कौतुक केले. माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी कोरोना काळात अनुराधा मिशनच्या अंतर्गत २०० खाटांच्या कोविड सेंटरच्या माध्यमातून केलेले कार्य व ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीचा संकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी लाभलेल्या लोकसहभागाची माहिती प्रास्ताविकात दिली. प्रकल्प उभारणीला मदत करणाऱ्या सर्व दात्यांचे ऋणनिर्देश याप्रसंगी व्यक्त केले. राहुल बोंद्रेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रकल्प उभारणीसाठी सरसावलेले मनोज दांडगे, नंदू शिंदे, शैलेश अय्या, सरपंच हळदे, गुडमार्निंग ग्रुपचे सदस्य आदी दात्यांचा मुकुल वासनिकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जि. प. अध्यक्षा मनीषा पवार, श्याम उमाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला आ. राजेश एकडे, माजी आ. दिलीपकुमार सानंदा, विजय अंभोरे, संजय राठोड, नगराध्यक्ष कासम गवळी, जि. प. सभापती ज्योती पडघान, दीपक देशमाने, अ. रफीक कादर, डॉ. इसरार, मनोज कायंदे, समाधान सुपेकर, अनंत वानखेडे, प्रदीप नागरे, दिलीप जाधव, प्रकाश पाटील, डॉ. अरविंद कोलते, अॅड. हरिश रावळ, शैलेश सावजी, देवानंद पवार, पद्म पाटील, स्वाती वाकेकर, करुणा बोंद्रे, भास्करराव ठाकरे, सुधाकर धमक, विष्णू पाटील कुळसुंदर, राम जाधव, नंदकिशोर सवडतकर, अतरोद्दीन काझी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राजेंद्र काळे सूत्रसंचालन केले. हिरकणी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अॅड. वृषाली बोंद्रे यांनी आभार मानले.
केंद्र सरकारचा दावा खोटा : वासनिक
ऑक्सिजनमुळे कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला नसल्याचा केंद्र सरकारचा दावा सपशेल खोटा आहे. केंद्र सरकार वस्तुस्थिती लोकांपासून लपवत आहे. दुसरीकडे भारतीय राज्य घटनेला साक्षी ठेवीत ज्यांनी प्रतिज्ञा केली, त्याच लोकांपासून राज्यघटनेला एकप्रकारे आव्हान दिले जात आहे. न्याय व्यवस्था व लोकशाही व्यवस्थेला त्यांच्यांचकडून धोका असल्याचे, स्पष्ट करीत केंद्रातील मोदी सरकारवर वासनिकांनी टीकास्त्र डागले.