रजतनगरी दुमदुमली

By admin | Published: August 20, 2015 11:56 PM2015-08-20T23:56:17+5:302015-08-20T23:56:17+5:30

‘श्रीं’च्या पालखीचे स्वागत; शहरातील रस्ते भक्तिभावाने सजले.

Rajtangari Dumdumli | रजतनगरी दुमदुमली

रजतनगरी दुमदुमली

Next

खामगाव : पंढरपूर येथून परतीच्या मार्गावर असलेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे गुरूवारी सकाळी ८.३0 वाजता खामगाव येथे आगमन झाले. ह्यश्रींह्णची पालखी संतनगरीत दाखल होताच विविध सामाजिक संघटना, धार्मिक आणि युवक मंडळांच्यावतीने ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी विदर्भ पंढरीनाथ गजानन महाराजांची पायदळ वारी पंढरपूर येथे संतनगरी शेगाव येथून रवाना झाली होती. त्यानंतर तब्बल ५५ पेक्षा जास्त दिवसांचा प्रवास करीत आता परतीच्या मार्गावर आहे. दरम्यान, शहरात गुरूवारी सकाळी पालखी दाखल होताच खामगाव बायपास रोडवरील हनुमान व्हिटामिन येथे पालखीचा पहिला मुक्काम झाला. या ठिकाणी पालखीच्या पूजनानंतर वारकर्‍यांना जेवण देण्यात आले. सनियंत्रण समितीचे विश्‍वपालसिंह जाधव, उपाध्यक्ष वैभव डवरे, सरस्वतीताई खासने, दिलीप पवार, शरदचंद्र गायकी, संजय सिनगारे, संतोष देशमुख यांची याप्रसंगी उपस्थिती होती. बाळापूर फैलात सम्राट अशोक क्रीडा मंडळाच्यावतीने आशिष धुंदळे, प्रकाश मोरे, कपिल खंडारे, धम्मा नितनवरे, सुमीत मेढे, महादेव वाकोडे यांनी स्वागत केले. त्यानंतर गौतम चौक, बाजार समिती मागील रस्त्याने भुसावळ चौक, सरकी लाईन मार्गे मुख्य रस्त्यावर पालखी पोहोचली. वाटेत विविध ठिकाणी भाविकांनी वारकर्‍यांना विविध साहित्याचे वितरण केले. यामध्ये गौतम चौक मित्रमंडळ, श्री हनुमान ऑटो स्टॉप सती फैल, सुरेका परिवार सती फैल, सरकी लाईन मित्रमंडळ, नेताजी नवयुवक मंडळ, चंदनशेष मंडळ, कालिंका सार्वजनिक उत्सव मंडळ, तुलसी भजनी मंडळ, रामदल मंडळ, जय गजानन मंडळ टॉवर चौक, जय संतोषी माँ नवयुवक मंडळ फरशी, आदर्श नवयुवक मंडळ, श्रीकृष्ण मंडळ, माँ वैष्णवी मंडळ रेखा प्लॉट मित्रमंडळाच्यावतीने नांदुरा रोडवर चहाचे वितरण करण्यात आले. टॉवर चौकात पाणीपुरी व्यावयायिक तसेच टॉवर चौक मित्रमंडळाच्यावतीने वारकर्‍यांना ओल्या नारळाचे वितरण करण्यात आले. सहाशे नारळांचे यावेळी वितरण झाले. विविध ठिकाणी महिला भाविकांनी सडा घालून आकर्षक रांगोळ्यांची आरास पालखी मार्गावर केली. यावेळी ध्वनिफित वाजवून तसेच फटाक्यांची आतषबाजी करून पालखीचे स्वागत करण्यात आले. सुटाळपुर्‍यातील संत गजानन अवलिया महाराज भक्तमंडळाने पालखीचे पूजन केले. याठिकाणी संत गजानन अवलिया महाराज भक्तमंडळाचे अध्यक्ष श्रीराम पंढरी पाटील यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाले. त्यानंतर वारकर्‍यांना भोजन देण्यात आले.

Web Title: Rajtangari Dumdumli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.