आयात धोरणाचा तूर उत्पादकांना फटका- राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 04:33 PM2020-02-09T16:33:08+5:302020-02-09T16:33:13+5:30
केंद्र सरकारच्या चुकीच्या कडधान्य आयात धोरणामुळे शेतकरी त्रस्त आहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हरकत नोंदवावी, असे शेट्टींनी स्पष्ट केले.
बुलडाणा: केंद्र सरकारच्या आयात धोरणाचा तूर उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला असून या विरोधात राज्य शासनाने अर्थात मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे जोरदार हरकत नोंदवावी. हमी भावापेक्षा कमी भाव शेतकऱ्यांना बाजारात मिळत आहे. त्याचा फरक थेट शेतकºयांच्या खात्यात जमा करावा, अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली.
स्वाभीमानी शेतकरी संघटनेची पुनर्रचना आणि पदाधिकारी निवडीच्या अनुषंगाने आठ फेब्रुवारी रोजी बुलडाण्यात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रविकांत तुपकर, दामू अण्णा इंगोले, बबन चेके, घनश्याम चौधरी, डॉ. ज्ञानेश्वर टाले, राणा चंदन, नंदीनी कल्याणकर उपस्थित होते. तूरीचा हमी भाव व बाजार भावात जवळपास १,५०० रुपयांचा फरक आहे. शेतकºयाला सरासरी सात क्विंटल तुरीचे उत्पादन होते. त्यानुषंगाने ही फरकाची रक्कम शेतकºयाच्या खात्यात जमा केली जावी, असे ते म्हणाले. केंद्र सरकारच्या चुकीच्या कडधान्य आयात धोरणामुळे शेतकरी त्रस्त आहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हरकत नोंदवावी, असे शेट्टींनी स्पष्ट केले. संघटनात्मक फेरबदलाचीही त्यांनी माहिती दिली. शिर्डी येथे २२ फेब्रुवारी रोजी संघटनेची बैठक होत असून त्यात राज्य कार्यकारीणी निवडण्यात येईल, असे ते म्हणाले. प्रारंभी रविकांत तुपकर यांनी बैठकीच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. बैठकीत घाटावरील स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ. ज्ञानेश्वर टाले तर स्वाभीमानीचे जिल्हाध्यक्ष म्हणून बबनराव चेके, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष म्हणून शेख रफीक शे. करीम, जिल्हा विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून पवनकुमार यांची निवड करण्यात आली. घाटाखालील संघटना अध्यक्ष म्हणून श्याम अवथळे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष म्हणून अनंता मानकर यांची निवड करण्यात आली. तर भगवान मोरे यांची राज्य कार्यकारीणीवर वर्णी लागणार असल्याचे ते म्हणाले.