‍ साखरखेर्डा येथे उद्या रक्तदान शिबिराचे आयाेजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:25 AM2021-07-18T04:25:10+5:302021-07-18T04:25:10+5:30

कोरोना काळात रक्तपेढ्यांमधील रक्तसाठा हा कमी झाला आहे. गरजू रुग्णांना रक्त मिळणे कठीण झाले आहे . आपण केलेल्या रक्तदानामुळे ...

रक्त Blood donation camp to be organized tomorrow at Sakharkheda | ‍ साखरखेर्डा येथे उद्या रक्तदान शिबिराचे आयाेजन

‍ साखरखेर्डा येथे उद्या रक्तदान शिबिराचे आयाेजन

Next

कोरोना काळात रक्तपेढ्यांमधील रक्तसाठा हा कमी झाला आहे. गरजू रुग्णांना रक्त मिळणे कठीण झाले आहे . आपण केलेल्या रक्तदानामुळे एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात . आज देशाला रक्ताची नितांत गरज आहे . त्या अनुषंगाने साखरखेर्डा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . या शिबिराला अनिकेत सैनिक स्कूल , श्री शिवाजी व्यायाम शाळा , ज्ञानगंगा मार्गदर्शन केंद्र , प्राथमिक आरोग्य केंद्र , जिल्हा परिषद सदस्य , माजी जिल्हा परिषद सदस्य , सरपंच , माजी सरपंच , ग्रामपंचायत सदस्य , विविध पक्षाचे पदाधिकारी मोलाचे सहकार्य करणार आहेत . आपणही एक जबाबदारी म्हणून रक्तदान शिबिरात भाग घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे़ प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र देण्यात येऊन सन्मान करण्यात येणार आहे़

Web Title: रक्त Blood donation camp to be organized tomorrow at Sakharkheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.