जिल्ह्यातील एक लाखावर शिधापत्रिका बोगस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:25 AM2017-11-01T00:25:02+5:302017-11-01T00:25:55+5:30
खामगाव: बुलडाणा जिल्ह्यात वितरित करण्यात आलेल्या पाच लाख ५४ हजार ४४५ शिधापत्रिकांपैकी एक लाखावर शिधापत्रिका बोगस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सन २00५ ते २0११ या कालावधीत जिल्ह्यातील ८५ हजार शिधापत्रिका बोगस ठरल्या होत्या.
खामगाव: बुलडाणा जिल्ह्यात वितरित करण्यात आलेल्या पाच लाख ५४ हजार ४४५ शिधापत्रिकांपैकी एक लाखावर शिधापत्रिका बोगस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सन २00५ ते २0११ या कालावधीत जिल्ह्यातील ८५ हजार शिधापत्रिका बोगस ठरल्या होत्या. त्यानंतर सहा वर्षांमध्ये यामध्ये तब्बल १६ हजार बोगस शिधापत्रिकांची वाढ झाल्याची खात्रीलायक माहिती आहे. बोगस शिधापत्रिकांचा शोध घेण्यासाठी सन २00५ ते २0११ या कालावधीत तत्कालीन राज्य शासनाच्यावतीने राज्यभर विशेष शोध मोहीम राबवली होती.
त्यावेळी मोठय़ा प्रमाणात बोगस शिधापत्रिका आढळून आल्या, तर बुलडाणा जिल्ह्यातील ८५ हजार ३७५ शिधापत्रिका बोगस आढळल्या होत्या. १६ टक्के त्याचे प्रमाण होते. गत सहा वर्षांंत शासनाकडून आणखी उपाययोजना करण्यात आल्या. परिणामी, बोगस शिधापत्रिकांची संख्या वाढली. हा आकडा आता लाखाच्या वर पोहोचल्याचे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे.
गेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात एक कोटीच्यावर शिधापत्रिका बोगस असल्याचे जाहीर केले होते. बापट यांनी आधार सिडींगमुळे बोगस शिधापत्रिका शोधल्याने ३६ हजार मेट्रिक टन धान्याची बचत झाल्याचा खुलासा केला होता. याबाबत पुरवठा विभागाच्या अधिकार्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार देत, कानावर हात ठेवले.