चिखलीत चिनी वस्तूंविरोधात रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 12:59 AM2017-08-10T00:59:29+5:302017-08-10T01:01:02+5:30
चिखली : राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियानांतर्गत ९ ऑगस्ट रोजी शहरात चिनी वस्तूंच्या विरोधात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये विविध शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिकांनी सहभाग नोंदवित राष्ट्रहितास्तव चिनी वस्तू न वापरण्याचा संकल्प केला.
लोकमत न्यूज नेटवर्क

भारतीय बाजारपेठेमध्ये चीनचे वाढलेले अतिक्रमण व देशातील रोजगारीवर आलेले संकट या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियान सर्वत्र राबविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील मुख्य रस्त्यांवरून चीनविरोधात नारेबाजी करत ही रॅली काढण्यात आली.
अभियानाचे तालुका संयोजक सुनील वायाळ यांनी चिनी वस्तूंच्या विरोधात अभियानाचे महत्त्व विशद केले.
जिल्हा संयोजक अँड.गिरीष दुबे यांनी चीन हा आपला प्रमुख शत्रू असून, पाकिस्तानला भारताविरोधी शक्ती देत असल्याचे स्पष्ट करीत, चिनी वस्तूंवर सर्वांनी बहिष्कार टाकावा, असे आवाहन केले. संचालन नगर संयोजक विलास o्रीवास्तव यांनी केले. या रॅलीत विविध राजकीय पक्ष, संघटना तसेच शिक्षण, सामाजिक, व्यापारी क्षेत्रातील मंडळींसह नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले होते.