शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2016 01:17 AM2016-04-11T01:17:05+5:302016-04-11T01:17:05+5:30

रॅलीमधून समतेचा संदेश रूजविण्याचे उपजिल्हाधिकारी घेवंदे यांचे अवाहन.

Rally for centenary silver jubilee | शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त रॅली

शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त रॅली

Next

धाड : विश्‍वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती पर्वावर धाड भागात शतकोत्तर रौप्य महोत्सव समिती धाडच्यावतीने २६ जानेवारी ते १४ एप्रिलपर्यंत प्रबोधन पर्व साजरे करण्यात येत असून, ९ एप्रिल रोजी मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
समाज प्रबोधन आणि समाजात समता, जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी संदेश गावागावांत पोहोचविण्याच्या दृष्टीने या मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. सकाळी ८ ते सायं. ५ पर्यंंत रॅली सुरू होती. बुलडाणा तालुक्यातील पैनगंगा नदीच्या उगमस्थान असणार्‍या बुधनेश्‍वरपासून या रॅलीस उपजिल्हाधिकारी रमेश घेवंदे यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. या ठिकाणी मार्गदर्शन करताना रमेश घेवंदे म्हणाले, की रॅलीत सहभागी विविध जाती धर्माच्या युवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा संदेश गावागावांत रुजवा आणि बाबासाहेबांचे विचार कृतीत आणण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी सुरेश वानखेडे, महेंद्र बोर्डे, अशोक इंगळे, पीएसआय गजानन मुंडे यांनी रॅलीस संबोधित केले. रॅलीत सहभागी तरुणांनी, महिलांनी विविध रंगाचे फेटे बांधले होते. तर बुलडाणा येथून वैशाली ठाकरे, सौ.ओहोळ, सौ.चव्हाण, मंजू जाधव, संयोगिता वानखडे यांनी सहभाग नोंदविला. मढ मार्गे तराडखेड, गुम्मी, मासरूळ, धामणगाव धाड, करडी, सातगाव म्हसला मार्गे जांब आणि विदर्भ हद्दीवरील दत्त मंदिरानजिक या रॅलीचा समारोप करण्यात आला. वाटेत असलेल्या गावांमधून नागरिकांनी रॅलीचे स्वागत केले. समारोपीय कार्यक्रमात नारायणराव जाधव येळगावकर यांनी विचार व्यक्त केले. आभार प्रदर्शन प्रशांत बोर्डे यांनी मानले.

Web Title: Rally for centenary silver jubilee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.