राणे, भुजबळ, पवारांना वठणीवर आणू : कदम
By Admin | Published: July 24, 2014 01:56 AM2014-07-24T01:56:23+5:302014-07-24T02:09:55+5:30
बुलडाणा येथील गर्दे वाचनालयाच्या सभागृहात शिवसेनेचा मेळावा संपन्न
बुलडाणा : राज्यात दहा हजार शेतकर्यांच्या आत्महत्या झाल्या. सिंचनाची कामे झाली नसल्याने शेतकरी देशोधडीला लागला. गेल्या पंधरा वर्षांमध्ये विविध घोटाळे करून आघाडी सरकारने राज्याला पन्नास वर्षे मागे नेले आहे. आता फक्त दोन महिने थांबा.. एकदा युतीचे सरकार आले की, नारायण राणे, छगन भुजबळ यांच्यासह अजित पवारांचेही घोटाळे चव्हाट्यावर आणून, त्यांना वठणीवर आणू, अशा शब्दात शिवसेना नेते रामदास कदम यांनी आघाडी सरकारच्या नेत्यांचा समाचार घेतला. भगव्या सप्ताहानिमित्त बुलडाणा येथील गर्दे वाचनालयाच्या सभागृहात शिवसेनेचा मेळावा संपन्न झाला. आघाडी सरकारने पंधरा वर्षे महाराष्ट्रावर राज्य केले; मात्र या राज्याला प्रगतीपथावर नेण्याऐवजी अधोगतीकडे नेले. महागाई, भ्रष्टाचार, घोटाळे करून या सरकारने जनतेच्या पैशावर डल्ला मारला. या सरकारला आता सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असा आरोप त्यांनी केला.