पत्नीच्या तक्रारीवरुन पतीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 02:01 PM2019-09-30T14:01:14+5:302019-09-30T14:01:19+5:30

पती व सासूविरुद्ध पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल झाल्याची घटना समोर आली आहे.

Rape crime against husband over complaint of wife | पत्नीच्या तक्रारीवरुन पतीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

पत्नीच्या तक्रारीवरुन पतीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

Next

बुलडाणा: इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारिरीक संबंध केल्याप्रकरणी पतीविरुद्ध शहर पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मानसिक,शारीरिक छळ केल्याप्रकरणी पती व सासूविरुद्ध पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल झाल्याची घटना समोर आली आहे.
स्थानिक मिर्झा नगरमधील अकबर खान, नाजीमा खान याच्यासोबत २०१६ मध्ये पीडितेचे मुस्लिम पद्धतीने लग्न झाले. सुरुवातीला सासरच्या मंडळीने चांगली वागणूक दिली. मात्र काही महिन्यानंतर पती व सासूने माहेराहून दोन लाख रुपये आणण्यासाठी मानसिक, शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. माहेरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने व वडील मजूरी करत असल्याने पैसे देणे शक्य झाले नाही. त्यामुळे सासरच्यांनी तिला घराबाहेर काढले. तेंव्हापासून पीडिता माहेरी राहत आहे. याबाबत पीडितेने पती व सासू विरोधात न्यायालयात दाद मागितली असून ते प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. दरम्यान पीडितेचा पती अकबर खान याने २१ जानेवारी २०१९ रोजी फोन करून पीडितेला मिर्झा नगरमधील घरी बोलावले. त्यानंतर इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. पीडितेने प्रतिकार केला असता जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडितीने शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पती अकबर खान इसाक खान विरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. सासू नाजीमा खान विरुद्धही विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे. घटनेचा तपास ठाणेदार शिवाजी कांबळे करीत आहेत.

Web Title: Rape crime against husband over complaint of wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.