अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 02:22 PM2020-02-18T14:22:00+5:302020-02-18T14:23:59+5:30

१५ वर्षीय अल्पवयीन मुलगी रविवारी सायंकाळी शौचासाठी बाहेर गेली होती.

Rape on a minor girl | अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगाव राजा: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी पाच आरोपींविरुद्ध देऊळगाव राजा पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला. यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. अत्याचाराची ही घटना रविवारी सायंकाळी असोला जहांगीर येथे घडली होती.
देऊळगाव राजा तालुक्यातील असोला जहांगीर येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी रविवारी सायंकाळी शौचासाठी बाहेर गेली होती. मुलगी बराच वेळ परत न आल्याने तिचा परिसरात शोध घेतला असता आरोपी मछिंद्र रामदास मांटे (वय २८) हा घटनास्थळावर मुलीवर लैंगिक अत्याचार करताना दिसला. तर दुसरा आरोपी ज्ञानेश्वर कैलास म्हस्के (वय २५) हा तिथून पळून गेला. पीडित मुलीला घेऊन घरची मंडळी आरोपींच्या घरी हकीकत सांगण्यासाठी गेले असता शिवाजी दगडू मांटे, जना कैलास म्हस्के, धोंडिबा म्हस्के यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यावरून पोलिसांनी पीडित मुलीच्या वैद्यकीय तपासणीच्या अहवालावरून आरोपी मछिंद्र रामदास मांटे, ज्ञानेश्वर कैलास म्हस्के, शिवाजी दगडू मांटे, जना कैलास म्हस्के, धोंडिबा म्हस्के सर्व (रा. असोला जहांगीर ता. देऊळगाव राजा) या पाच जणांविरुद्ध लैंगिक अत्याचारांच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात ठाणेदार संभाजी पाटील यांचे मार्गदर्शनात पोलिसांनी तात्काळ आरोपी मछिंद्र रामदास मांटे व ज्ञानेश्वर कैलास म्हस्के या दोघांना अटक केली. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीसअधिकारी भिमानंद नलावडे हे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Rape on a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.