लग्नाचे आमिष देऊन युवतीवर बलात्कार; नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 10:58 PM2019-01-21T22:58:03+5:302019-01-21T22:58:13+5:30

लग्नाचे आमिष  देऊन युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी युवकासह नऊ जणांविरोधात शेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Rape victim raped by marriage lover; Filed Against Nine People | लग्नाचे आमिष देऊन युवतीवर बलात्कार; नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल 

लग्नाचे आमिष देऊन युवतीवर बलात्कार; नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल 

Next

शेगाव : लग्नाचे आमिष  देऊन युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी युवकासह नऊ जणांविरोधात शेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वैभव सदाशिव तोरखडे (वय २६ ) रा. सौंदळा ता. तेल्हारा जि.अकोला याने गावातीलच एका युवतीसोबत प्रेम संबंध प्रस्थापित केले. ‘नोकरी लागल्यानंतर आपण विवाह करू’ असे आमिष देत त्याने युवतीसोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केले. यानंतर १ जानेवारी २०१९ रोजी वैभव तोरखडे व राहुल मुरलीधरन शिंत्रे यांनी शेगांव येथे एका गेस्ट हाऊसवर युवतीला नेऊन अत्याचार केला.

याआधी वर्ष २०१८ मध्ये वैभव तोरखडे याने जबरी संभोग केल्यामुळे पिडीत युवती गरोदर राहिली होती. त्यावेळी वैभव तोरखडे, राहुल शिंत्रे यांच्यासह संतोष महादेव तोरखडे, अरुण वामन शिंत्रे, नवलकुमार साहेबराव अरबट, निलेश सुरेश खंडेराव, महादेव प्रल्हाद तोरखडे, सदाशिव प्रल्हाद तोरखडे,  रंजना तोरखडे सर्व रा.सौंदळा ता. तेल्हारा जि. अकोला यांनी युवतीचा गर्भपात घडवून आणण्याचा कट रचला. यामुळे झालेल्या रक्तस्रावामुळे  २७ आॅक्टोबर २०१८ रोजी अकोला येथील एका हॉस्पिटलमध्ये युवतीने उपचार घेतला.

यानंतर आरोपींनी युवतीस तिच्या गावी नेऊन सोडले व जातिवाचक शिविगाळ केली. यापुढे लग्नाचा विचार केल्यास, जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान याप्रकरणी पिडीत युवतीने शेगांव शहर पोलिस स्टेशनला तक्रार दिली. यावरून युवकासह नऊ जणाविरूध्द सोमवारी अप न. क्र १९/२०१९ कलम ३७६(ग ) ३१३, १२०(ब ), ५०४, ५०६ भादंविसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील यांच्या मार्गदर्शनात शहर ठाणेदार सुनिल हुड , एपीआय सचिन चव्हाण, राजु चौधरी हे करीत आहेत. 

Web Title: Rape victim raped by marriage lover; Filed Against Nine People

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.