इस्लामपूर शिवारात महिलेवर बलात्कार
By admin | Published: April 15, 2015 01:01 AM2015-04-15T01:01:31+5:302015-04-15T01:01:31+5:30
पीडित महिलेची तक्रार, आरोपीस पोलिस कोठडी.
जळगाव जामोद (जि. बुलडाणा ): आदिवासी महिला शौचास जात असताना तिला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना १३ एप्रिलच्या रात्री इस्लामपूर, ता. जळगाव जामोद शिवारात घडली.
याबाबत पीडित महिलेने जळगाव पो.स्टे.ला फिर्याद दाखल केली. त्यावरून आरोपी नानसिंग ऊर्फ गुड्ड नारसिंग मोहिते (वय २४) वर्षे रा. जम्मू पाणी, ता.जि. बर्हाणपूर मध्यप्रदेश ह.मु. इस्लामपूर शिवार याने फिर्यादी महिला गर्भवती अस ताना तिला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तिला जिवानिशी मारण्याची धमकी दिली आणि तिला मलकापूर ये थे पायी घेऊन गेला. तक्रारीवरून आरोपी नानसिंग विरुद्ध भादंविच्या कलम ३६३,३६६,३७६ (२), (ह), ५0६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीस अटक केली असून, जळगाव जामोद पोलीस कोठडी सुनावनली आहे. याप्रकरणी पुढील तपास ठाणेदार एम.एम. भोगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणपतराव राठोड हे करीत आहेत.