नशेचे पान देत तरुणीवर केला बलात्कार
By admin | Published: June 22, 2017 12:38 PM2017-06-22T12:38:11+5:302017-06-22T12:38:11+5:30
फौजदार पित्यासह पोलीस पुत्रावर गुन्हा. बंदुकीने ठार मारण्याची दिली धमकी
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.22 - वाढदिवसानिमित्त गिफ्ट देतो असे सांगत नशेचा पदार्थ मिश्रीत पान देत 24 वर्षीय तरुणीवर बलात्कार करणा:या पोलीस मुख्यालयातील कर्मचारी परवेज शेख तसेच मुलाला साहाय्य करणा:या फौजदार पित्याविरूद्ध बुधवारी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी असलेले पितापुत्र फरार झाले आहेत.
पीडित तरुणीची 2012 मध्ये पोलीस मुख्यालयात कर्मचारी असलेल्या परवेज याच्या बहिणीशी ओळख झाली होती. त्या माध्यमातून परवेज पीडित तरुणीच्या संपर्कात आला. या ओळखीचा गैरफायदा घेत परवेज याने पीडित तरुणीला पोलीस मुख्यालयातील स्पोर्टस्ची खोली, रेल्वे स्टेशनमधील हॉटेल, लॉज, नवीन बसस्थानकातील कॅँटीनच्या वरच्या मजल्यावर व फर्दापूर येथे 2012 ते मे 2017 या कालावधीत सातत्याने बलात्कार केला. या काळात या बलात्काराची वाच्यता केली तर बंदुकीच्या गोळीने ठार मारण्याची धमकीही दिली.पीडित तरुणी ही अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. परवेज याचा वाढदिवस असल्याने तो तिला फिरण्यासाठी फर्दापूर येथे घेवून गेला होता. तेथे एका हॉटेलमध्ये वाढदिवसाचे गिफ्ट देतो असे सांगून नशेचा पदार्थ मिश्रण असलेले पान खायला देवून तिच्यावर बलात्कार केला. बलात्काराच्या घटनेनंतर पोलीस कर्मचा:याचा पिता व जिल्हा पोलीस दलातील क्रीडा विभागातील फौजदार रईस शेख याने तरुणीशी अश्लिल कृत्य केले. सर्व प्रकार असह्य झाल्याने पीडित तरुणीने जिल्हापेठ पोलीस स्टेशनला दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपनिरीक्षक सुप्रिया देशमुख करीत आहेत.