सातपुड्यात आढळला दुर्मीळ शॅमेलियन सरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:57 AM2018-02-13T00:57:58+5:302018-02-13T00:58:21+5:30

जळगाव जामोद: सातपुड्याच्या जंगलामध्ये रंग बदलणारा सरडा शॅमेलियन आढळून आला. सदर शॅमेलियन सर्पमित्र सुनील भगत आणि शरद जाधव यांना सातपुड्यात रस्त्यावर फिरताना आढळला. हा सरड्याच्या प्रजातीचा असून, तो वेळेनुसार आणि संकटसमयी आपला रंग बदलत असतो.

The rare Shamellionn wines found in satpuda vhally | सातपुड्यात आढळला दुर्मीळ शॅमेलियन सरडा

सातपुड्यात आढळला दुर्मीळ शॅमेलियन सरडा

googlenewsNext
ठळक मुद्देसर्पमित्र सुनील भगत आणि शरद जाधव यांना सातपुड्यात रस्त्यावर फिरताना आढळला

जयदेव वानखडे। 
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद: सातपुड्याच्या जंगलामध्ये रंग बदलणारा सरडा शॅमेलियन आढळून आला. सदर शॅमेलियन सर्पमित्र सुनील भगत आणि शरद जाधव यांना सातपुड्यात रस्त्यावर फिरताना आढळला. हा सरड्याच्या प्रजातीचा असून, तो वेळेनुसार आणि संकटसमयी आपला रंग बदलत असतो.
या सरड्याला रंग बदलणारा गिरगिट, हरण सरडा असे म्हणूनही ओळखला जाते. हा सॅमेलियन झाडावर राहतो, तर कधी-कधी तो आपल्या भक्ष्याच्या शोधार्थ रस्त्यांवर आढळून येतो. झाडावर चढताना झाडाचे खोड ज्या रंगाचे असेल तसा रंग बदलतो कधी हिरवा, पिवळा, काळसर असे रंग बदलत राहतो. त्यामुळे त्याचे संरक्षण होते. या सरड्याची शेपटी लांब असते, त्यामुळे तो झाडाच्या फांदीला शेवटी गुंडाळून झोकेसुद्धा घेतो. याबाबतची माहिती प्राचार्य भगत यांनी दिली.
सदर सरडा हा सर्पमित्र भगत आणि जाधव यांना सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकला जाताना दिसला. त्यांनी याबाबत वन अधिकारी कांबळे यांच्याशी संपर्क करून माहिती कळविली व त्यानंतर सरड्याला सातपुड्याचे जंगलात सोडल्याचे सांगितले. हा सरडा अनेकांनी उत्सुकतेने बघितला. सातपुडा हा विविधतेने नटलेला पर्वत असून, यामध्ये नानाविध प्रजातीचे साप, पशु-पक्षी सरपटणारे प्राण्यांचे वास्तव्य असल्याचे यावरून समजते. तसेच सातपुड्यात वनौषधीसुद्धा आढळतात. 
 

Web Title: The rare Shamellionn wines found in satpuda vhally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.