रेशन दुकानदारांना दोन हजारांचा फटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2016 01:14 AM2016-07-02T01:14:31+5:302016-07-02T01:14:31+5:30
‘मॅडम’च्या घरी लग्न असल्याचे सांगितले जाते कारण.
नांदुरा (जि. बुलडाणा) : तालुक्यातील प्रमुख अधिकारी असलेल्या ह्यमॅडमह्णच्या बहिणीचा विवाह असल्याचे कारण सांगून तालुक्यातील रेशन दुकानदारांकडून प्रत्येकी दोन-दोन हजार रुपये गोळा करण्यात आल्याची चर्चा शहरात होत आहे. एवढय़ा मोठय़ा अधिकारी असलेल्या मॅडमला अशी रक्कम गोळा का करावी लागली की त्यांचा धाक दाखवून दुसर्यांनीच हात मारला, हा मॅडमसाठी संशोधनाचा विषय आहे. त्यांच्या नावावरती अशी रक्कम गोळा केली जात आहे, हे कदाचित त्यांना माहीतही नसेल. कोणतेही काम असो, वरिष्ठ अधिकारी येवो, त्यांच्या खर्चाची ह्यसुरीह्ण स्वस्त धान्य दुकान चालविण्यावर येणे नित्याचेच आहे. रेशन दुकान चालविणे म्हणजे चुका होणारच! अशा नकळत होत असलेल्या त्रुटींवर बोट ठेवून अधिकार्यांना दरमहा रेशन पुरवावेच लागते. रेकॉर्ड तपासणीच्या नावावर तर खालपासून वरपर्यंत सर्वांंना काहीना काही द्यावे लागते. त्यात तपासणीच्या फेर्याही खूप असतात. त्यात वैतागलेल्या रेशन दुकानदारांना आता अधिकार्यांच्या घरी असलेल्या विवाहासाठीसुद्धा ह्यखारिचा वाटाह्ण उचलावा लागला. असा वाटा उचलण्यास नकार दिल्यास तपासणीच्या गोंडस नावाखाली रेशन दुकानदार भरडला जातो, त्यामुळे निमूटपणे सर्व स्वस्त धान्य दुकानदार अशा मागण्यांना नाही म्हणत नाही व कोठे वाच्यताही करीत नाहीत, त्यामुळेच अशा वसुलीचे प्रमाण वाढत असल्याचे स्वस्त धान्य दुकानदारांच्या चर्चेतून समजते.