रेशनचा काळाबाजार कोट्यवधीच्या घरात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 12:45 AM2017-09-08T00:45:54+5:302017-09-08T00:46:15+5:30

रेशनच्या मालाचा काळाबाजार जिल्हय़ातील  सर्वच तालुक्यांमध्ये होत असून, या काळ्या बाजारात  कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. गोरगरिबांच्या  तोंडचा घास हिरावणारी मोठी लॉबी विदर्भात सक्रिय  असून, याचे धागेदोरे शोधून काढण्याचे मोठे आव्हान  पोलीस प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. 

Ration black market in billions of houses | रेशनचा काळाबाजार कोट्यवधीच्या घरात 

रेशनचा काळाबाजार कोट्यवधीच्या घरात 

Next
ठळक मुद्देजिल्हय़ात गरिबांच्या तोंडचा घास हिरावणारी मोठी  लॉबी!पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान जिल्हय़ातील सर्वच तालुक्यांमध्ये शनच्या मालाचा  काळाबाजार 

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: रेशनच्या मालाचा काळाबाजार जिल्हय़ातील  सर्वच तालुक्यांमध्ये होत असून, या काळ्या बाजारात  कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. गोरगरिबांच्या  तोंडचा घास हिरावणारी मोठी लॉबी विदर्भात सक्रिय  असून, याचे धागेदोरे शोधून काढण्याचे मोठे आव्हान  पोलीस प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. 
खामगाव शहर पोलीस स्टेशनच्यावतीने २0 ऑगस्ट  रोजी काळाबाजारात जाणारा रेशनचा तब्बल ६00  िक्वंटल तांदूळ १४ चाकी ट्रकसह पकडण्यात आला हो ता. या कारवाईमुळे रेशनचा काळाबाजार चव्हाट्यावर  आला. यामध्ये पकडला गेलेला तांदूळ वाहून नेणारा ट्रक  हा नांदुरा येथील ओम राठी यांच्या मालकीचा असून, तो  शासनाने द्वारपोच योजनेंतर्गत अधिग्रहित केलेला आहे.  त्यामुळे या ट्रकचा वापर खासगी वाहतुकीसाठी करता  येणे शक्य नाही; मात्र रेशनचा तांदूळ पोते बदलून  गोंदियाकडे नेण्यात येत होता. काळाबाजारात जाणारा  तांदूळ अगोदर नांदुरा येथे गोळा केला जाऊन नंतर तो  बाजारात नेला जात असल्याचे या कारवाईमध्ये  उघडकीस आले. याच दिवशी बुलडाण्यातही रेशनचा  तांदूळ पकडला गेला होता. यानंतर १ सप्टेंबरला  खामगावनजीकच्या वाडी येथे रेशन दुकानदार चांडक  यांच्या गोडावूनवर शहर पोलिसांनी छापा मारला असता  मोठय़ा प्रमाणात धान्यसाठा व बारदाण्यासह इतर ऐवज  आढळून आला. यावेळी तब्बल ३२ लाखाचा मुद्देमाल  जप्त करण्यात आला. 
यानंतरही जिल्हय़ात ठिकठिकाणी रेशनचा माल  काळाबाजारात नेताना पकडला गेला आहे. दोन मोठय़ा  कारवाया व इतर घटना पाहता रेशनचा काळाबाजार  जिल्हय़ात चांगलाच फोफावला असून, यामध्ये  महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत  असल्याचे दिसून येते. जिल्हय़ातील रेशनच्या मालाची  एवढय़ा मोठय़ा प्रमाणात अफरातफर होत असताना  पुरवठा विभाग मात्र यापासून   अनभिज्ञ कसा काय राहू  शकतो हा कळीचा मुद्दा होऊ शकतो. पुरवठा  विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने तर हा  काळाबाजार होत नाही ना अशी शंका उपस्थित  झाल्याशिवाय राहत नाही. जिल्हय़ातील रेशनचा तांदूळ  हा गोंदिया, भंडारा जिल्हय़ातील राइस मिलमध्ये जातो व  तेथे पॉलिशिंग करून तोच बाजारात दामदुप्पट भावाने  विकला जातो, अशी माहिती पोलिसांना मिळालेली आहे.  तर या रॅकेटमध्ये अनेक बड्या व्यापार्‍यांचा समावेश  असून, त्यांचा समावेश आरोपींमध्ये केला जाण्याची श क्यता पोलिसांनी याआधीच वर्तविली आहे; परंतु १५  दिवस उलटूनही अद्याप त्या दृष्टीने कोणतीही प्रगती  झालेली दिसत नाही.

पालकमंत्र्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न
राज्याचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री ना. भाऊसाहेब  फुंडकर यांच्या जिल्हय़ात  रेशनचा काळाबाजार  चव्हाट्यावर आला. त्यातही त्यांचे होमटाउन  खामगावलगतच्या शहर व गावांमध्ये या काळ्या  बाजाराची उगमस्थाने दिसत आहेत. त्यामुळे  त्यांच्यासाठी सुद्धा हा चिंतेचा विषय ठरला आहे.  गोरगरिबांच्या तोंडचा घास हिरावणार्‍या या  रेशनमाफियांच्या मुसक्या आवळल्या जाणे फुंडकरांच्या  राजकीय प्रतिष्ठेकरिता आवश्यक बनलेले आहे.  याकरिता पालकमंत्र्यांनी संबंधितांना योग्य ते निर्देश द्यावे त, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. 

Web Title: Ration black market in billions of houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.