काळा बाजारात  रेशनचा तांदूळ पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:39 AM2017-08-28T00:39:26+5:302017-08-28T00:39:45+5:30

धाड: येथून जवळच असलेल्या धामणगाव येथे २७ ऑगस्ट रोजी ५ वाजताच्या सुमारास काळ्या बाजारात जाणारा रेशनचा ५ क्विंटल तांदूळ धाड पोलिसांनी जप्त केला असून, वाहन चालकास अटक करून एक लाख ३0 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

Ration of ration in black market has been found | काळा बाजारात  रेशनचा तांदूळ पकडला

काळा बाजारात  रेशनचा तांदूळ पकडला

Next
ठळक मुद्देरेशनचा ५ क्विंटल तांदूळ धाड पोलिसांनी जप्त केला वाहन चालकास अटक करून एक लाख ३0 हजार रुपयांचा ऐवज जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
धाड: येथून जवळच असलेल्या धामणगाव येथे २७ ऑगस्ट रोजी ५ वाजताच्या सुमारास काळ्या बाजारात जाणारा रेशनचा ५ क्विंटल तांदूळ धाड पोलिसांनी जप्त केला असून, वाहन चालकास अटक करून एक लाख ३0 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
सार्वजनिक वितरण प्रणालीतून रेशन मार्फत गोरगरिबांना दिला जाणारा माल सर्रासपणे काळ्या बाजारात विक्रीकरिता असल्याची माहिती मिळताच धाड पो.स्टे. ठाणेदार संग्राम पाटील यांनी आपल्या ताफ्यासह ५ वाजता धामणगाव येथे सापळा रचून उभे असता अँपे क्र. एम.एच. २0 केपी ३४१५ येताना दिसला, चौकशी केली असता त्यात ५ क्विंटल रेशनचा तांदूळ आढळला. मालाविषयी चौकशी केली असता अँपे चालकाने समाधानकारक उत्तर न दिल्याने ताब्यात घेऊन धाड पोलीस स्टेशनला आणून गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटनेत ५ क्विंटल तांदूळ किंमत १0 हजार रुपये, अँपे मालवाहक किंमत १ लाख २0 हजार असा एकूण १ लाख ३0 हजाराचा माल जप्त करून अँपेचालक शे. अनिस शे. रफीक धाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई ठाणेदार संग्राम पाटील, पोहेकॉ ओमप्रकाश सावळे, गजानन मोरे, पोकॉ विठ्ठल कोंडे, प्रकाश दराडे यांनी दिली.    

Web Title: Ration of ration in black market has been found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.