खामगावात रेशनच्या गव्हाची अफरातफर; ट्रक, मिनीट्रक ताब्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 04:40 PM2018-03-27T16:40:50+5:302018-03-27T16:40:50+5:30

खामगाव :  रेशनच्या गव्हाची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून ७ कट्टे उतरवून दुसऱ्या वाहनात टाकल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी खामगावात उघडकीस आला.

Ration wheat thept in khamgaon | खामगावात रेशनच्या गव्हाची अफरातफर; ट्रक, मिनीट्रक ताब्यात 

खामगावात रेशनच्या गव्हाची अफरातफर; ट्रक, मिनीट्रक ताब्यात 

Next
ठळक मुद्दे शासकीय मालाची वाहतूक करणारा एम एच २७ एक्स- ०७३६ रेशनच्या ३९२ कट्टे गहू घेवून बुलडाणा येथे जात होता.चिखली बायपासवरील एका हॉटेल समोरील खुल्या जागेत हा ट्रक थांबविण्यात आला. पोलिसांनी एम एच २७ एक्स ०७३६ च्या चालकासोबतच टाटा मिनी ट्रक क्रमांक  एम एच २८ एबी १६५० च्या चालकासह आणखी एक  अशा तिघांना ताब्यात घेतले.

खामगाव :  रेशनच्या गव्हाची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून ७ कट्टे उतरवून दुसऱ्या वाहनात टाकल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी खामगावात उघडकीस आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तिघांसह दोन वाहनांना  चिखली बायपासवरून ताब्यात घेतले. या कारवाईमुळे रेशन मालाच्या घोटाळ्याने पुन्हा डोके वर काढले की? काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 शासकीय मालाची वाहतूक करणारा एम एच २७ एक्स- ०७३६ रेशनच्या ३९२ कट्टे गहू घेवून बुलडाणा येथे जात होता. दरम्यान, चिखली बायपासवरील एका हॉटेल समोरील खुल्या जागेत हा ट्रक थांबविण्यात आला. त्यानंतर या ट्रकमधून दुसऱ्या  एका वाहनांमध्ये गव्हाचे कट्टे टाकल्या जात असल्याची गुप्त माहिती शिवाजी नगर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे  पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी रेशनच्या गव्हाची वाहतूक करणाºया ट्रकमधून बाजूला उभ्या असलेल्या टाटा कंपनीच्या मिनीट्रकमध्ये तिघे जण गव्हाचे कट्टे टाकत असताना मिळून आले.  त्यामुळे पोलिसांनी एम एच २७ एक्स ०७३६ च्या चालकासोबतच टाटा मिनी ट्रक क्रमांक  एम एच २८ एबी १६५० च्या चालकासह आणखी एक  अशा तिघांना ताब्यात घेतले. उपरोक्त तिघांची कसून चौकशी करण्यात येत असून, दोन्ही वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी महसूल प्रशासनाला पत्र दिले आहे. या पत्राचे उत्तर वृत्त लिहीस्तोवर अप्राप्त असल्याने पुढील कारवाईस विलंब होत आहे.


 

महसूल प्रशासनाची टाळाटाळ!

रेशनच्या गव्हाची अफरातफर उघडकीस आल्यानंतर शिवाजी नगर पोलिसांनी पकडण्यात आलेल्या गहू शासकीय असल्याची विचारणा करण्यासाठी महसूल प्रशासनाला पत्र दिले. मात्र, महसूल प्रशासनाकडून सुरूवातीला याप्रकरणी पत्र घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर पत्राचे उत्तर देण्यास विलंब करण्यात येत असल्याने कारवाई थंडबस्त्यात पडल्याची माहिती विश्वसनिय सुत्रांनी दिली.


तांदुळानंतर गव्हाचा काळाबाजार!

रेशनच्या तांदुळाचा २० टन साठा गत आॅगस्ट महिन्यात शहर पोलिसांनी जप्त केला होता. कारवाईत हा साठा रेशनचा असल्याचे उघडकीस आल्यानंतर आॅगस्ट महिन्यात शासकीय गोदामात जमा करण्यात आला होता. त्यावेळी रेशनच्या तांदुळाच्या अफरातफरीचे बिंग फुटले होते. त्यानंतर आता शासकीय गव्हाची वाहतूक करणाºयांकडून गव्हाची अफरातफर केली जात असल्याचे समोर आले आहे.


 

Web Title: Ration wheat thept in khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.