रावेर लोकसभा : मलकापूर मतदारसंघात ११ वाजेपर्यंत २०.८५ टक्के मतदान
By सदानंद सिरसाट | Published: May 13, 2024 11:42 AM2024-05-13T11:42:38+5:302024-05-13T11:57:48+5:30
रावेर लोकसभा निवडणूकीसाठी मलकापूर विधानसभा मतदारसंघात सोमवारी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदारसंघातील केंद्रात मतदार मतदानासाठी पुढे येत आहेत. शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांचा समप्रमाणात त्यात सहभाग आहे.
मलकापूर (बुलढाणा) : रावेर लोकसभेच्या मलकापूर विधानसभा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत २०.८५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. वातावरण ढगाळ असल्याने मतदारांची गर्दी वाढत आहे.त्यामुळे येत्या दोन तासात मतदान वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.