लखपती वाणाकडे शेतकºयांची पाठ!
By admin | Published: June 2, 2017 01:23 PM2017-06-02T13:23:37+5:302017-06-02T13:23:37+5:30
लखपती, करोडपती यासारख्या नावाने प्रचलीतअसलेल्या सोयाबीनच्या वाणाला फळधारणाच झाली नसल्याचा अनुभव शेतकºयांनाआला आहे.
Next
३ लाख ६१ हजार क्षेत्रावर सोयाबीनचे नियोजन : बियाण्याच्या उगवणशक्तीची भिती
बुलडाणा : पश्चिम वऱ्हाडात गेल्या तीनवर्षापासून अनेक शेतकऱ्यांना बोगस
बियाण्याचा फटका बसत असून लखपती, करोडपती यासारख्या नावाने प्रचलीत
असलेल्या सोयाबीनच्या वाणाला फळधारणाच झाली नसल्याचा अनुभव शेतकऱ्यांना
आला आहे. जिल्ह्यात यावर्षी ३ लाख ६१ हजार क्षेत्रावर सोयाबीन पेरणीचे
नियोजन करण्यात आले असून सोयाबीन बियाण्याच्या उगवणशक्तीच्या भितीने
बहुतांश शेतकऱ्यांनी लखपती वाणाकडे पाठ फिरवली आहे.