शिवसंपर्क अभियानात फुटली शेतक-यांच्या समस्यांचा वाचा
By admin | Published: May 15, 2017 02:18 PM2017-05-15T14:18:16+5:302017-05-15T15:04:45+5:30
या अभियानांतर्गतआलेल्या नेत्यांपुढे सुलतानपूर येथील शेतक-यांनी आपल्या व्य्था मांडल्या.
ऑनलाइन लोकमत
लोणार, दि. 15 - महाराष्ट्रातील जनतेला सरकारबद्दल, शिवसेनेबद्दल काय वाटते,शेतक-यांच्या व तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्या काय अडचणी आहेत,त्यांच्या काय मागण्या आहेत, याची प्रत्यक्ष माहिती मिळावी व त्यांना न्याय देता यावा, यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रभर शिवसंपर्क अभियान राबविणे सुरु केले आहे.
या अभियानांतर्गतआलेल्या नेत्यांपुढे सुलतानपूर येथील शेतक-यांनी आपल्या व्य्था मांडल्या. शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव, सिंचनाच्या सुविधा,संपूर्ण कर्जमुक्ती सरकारमध्ये राहून होत नसतील आणि शेतक-यांना
न्याय देता येत नसेल तर सरकार मधून बाहेर पडा, असा शेतक-यांचा सूर शिवसंपर्क अभियानादरम्यान पदाधिकारी यांचे समोर उमटला.
मुंबई येथील नगरसेवक हाजी मोहम्मद दलीम खान यांचेसह शिवसेना पदाधिकारी यांनी लोणार तालुका दौरावर आले असता त्यांनी प्रथम सुलतानपूर गावाला भेट दिली. आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुबीयांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
त्यानंतर येसापूर, भानापुर, उदनापूर, कोयाळी, अंजनी खुर्द या गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी आमदार डॉ.संजय रायमुलकर,शिवसेना तालुका प्रमुख बळीराम मापारी, कृउबा सभापती शिवपाटील तेजनकर,
कृउबा संचालक विठ्ठल घायाळ, डॉ.प्रदीप मोरे, गणेश सोसायटी अध्यक्ष गजेंद्र मापारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)