वास्तववादी कवितांनी रसिक भारावले!
By admin | Published: March 14, 2016 01:45 AM2016-03-14T01:45:36+5:302016-03-14T01:45:36+5:30
कवींनी सादर केल्या विविधरंगी भावनांच्या कविता.
बुलडाणा : अत्यंत मोजक्या शब्दांमध्ये जास्तीत जास्त हृदयस्पश्री आशय सांगणार्या व तितक्याच पोटतिडीकीने समाजाचे वास्तव मांडणार्या कविता सादर करून विविध कवींनी बुलडाणेकर रसिकांना भावरंगाच्या वर्षावात चिंब केल्याचे चित्र संत चोखामेळा साहित्य नगरीत दिसून आले.
स्थानीय गर्दे वाचनालयातील संत चोखामेळा साहित्य नगरीत संमेलनाच्या सातव्या सत्रात १३ मार्च रोजी कविसंमेलन घेण्यात आले. अध्यक्षस्थानी राज्याचे शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर होते. प्रमुख पाहुणो म्हणून आपल्या ग्रामीण भागातील कवितांनी महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारे लोककवी विठ्ठल वाघ हे होते. विचारपीठावर कवी प्रशांत असनारे, अशोक कोतवाल, नारायण जाधव येळगावकर, सुरेश साबळे, सुभाष किन्होळकर, श्रीरंजन आवटे, गोविंद गायकी, अमरचंद कोठारी, प्रेषित सिद्धभट्टी, किरण डोंगरदिवे, सचिन कापसे, गोपाल वाकोडे, रवींद्र साळवे, संजय भारती, किशोर बळी आदी उपस्थित होते. कार्यक्रमात सर्वप्रथम शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर संमेलनाचे संयोजक नरेंद्र लांजेवार यांनी शाल-श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.
कविसंमेलनाची सुरुवात लोककवी विठ्ठल वाघ यांनी आपल्या खास वर्हाडी भाषेतील शैलीने केली. त्यानंतर प्रशांत असनारे यांनी ह्यमाझी मुलगी पावसाचं चित्र काढते..ह्ण ही कविता सादर केली. या कवितेतून त्यांनी आजच्या वास्तविक स्थितीचे सुंदर विेषण केले. अशोक कोतवाल यांनी ह्यमनोगत शाळेच्या मधल्या सुटीतून पळून जाणार्या मुलाचेह्ण ही कविता सादर केली, तेव्हा शिक्षण क्षेत्रातील चित्र उपस्थित रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर उभे झाले. नारायण जाधव येळगावकर यांनी ह्यया गाऊया गड्यांनो गीत-गाणी पावसाचीह्ण या गीताची सुरुवात करताच उपस्थित बालरसिकांच्या मनाचा ठाव घेतला गेला. सुरेश साबळे यांनी ह्यचळवळ, चौक आणि कार्यकर्ताह्ण या कवितेतून आजच्या भरकटलेल्या चळवळींचा वास्तवदश्री आढावा मांडला. उपस्थित बालरसिकांना भावली ती सुभाष किन्होळकरांची ह्यचिंगी-भिंगी, चिंगी-भिंगी दोन बहिणी, दोन रंगी दोन ढंगीह्ण कविता. आदिवासी-ग्रामीण जीवनाचे चित्र रंगवणार्या कवितांसाठी प्रसिद्ध असणार्या प्रा. डॉ. गोविंद गायकी यांनी ह्यएक पाकोडी पाकोडीह्ण या कवितेची तान धरताच उपस्थितांनी टाळ्यांचा वर्षाव केला. अमरचंद कोठारी यांनीदेखील मामा-मावशीच्या गावाला गेलेल्या छोट्या मुला-मुलींच्या भावभावना आपल्या सुंदर कवितेतून मांडल्या. प्रेषित सिद्धभट्टी यांनी ह्यकत्तलखान्यातील अखेरचे श्वासह्ण ही कविता सादर केली. सचिन कापसे यांनी आपल्या कवितेतून विचारा-विचारांमधील तफावत आणि त्यातून होणारे वैचारिक द्वंद तसेच माणसा-माणसातील वाढत जाणार्या अंतराबाबतचे चित्र आपल्या कवितेतून सुरेखपणे मांडले. गोपाल वाकोडे यांनी शेतात काम करणार्या एका आईचे चित्रण करणारी कविता ह्यपर्हाटीच्या वावरात माही माय कापूस वेचतेह्ण सादर केली. किरण डोंगरदिवे यांनी शाळेच्या समोर बोरं विकणार्या वृद्ध आजीची व्यथा कथन केली. रवींद्र साळवे यांनी तर नोकरीला लागलेल्या एका मध्यमवर्गीय पुरुषाची हृदयस्पश्री स्थिती स्पष्ट केली. संजय भारती यांनी कवितेतून दुष्काळाची व्यथा मांडली. संचालन करणारे ग्रामीण कवी किशोर बळी यांनीदेखील ह्यघाव होतील पावलो पावली, वार होतील ठायी ठायीह्ण ही शेतकर्यांमध्ये आत्मबळ जागविणारी कविता, तर आयुक्त भापकर यांनी शिक्षणापासून वंचित व बालमजुरीत अडकलेल्या विद्यार्थ्यांची व्यथा मांडणारी कविता सादर केली.