मुलींना छेडणाऱ्यांची यापुढे गय नाही; तक्रार पेट्यांमधून १२ तक्रारी प्राप्त, पडताळणीनंतर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 04:18 PM2018-07-21T16:18:11+5:302018-07-21T16:19:48+5:30
बुलडाणा : शाळकरी मुली व महाविद्यालयीन युवतींसाठी शहर पोलिसांनी लावलेल्या तक्रार पेट्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून २१ जुलै रोजी या तक्रारी पेट्या उघडल्यानंतर १२ तक्रारी प्राप्त झाल्या.
- सोहम घाडगे
बुलडाणा : शाळकरी मुली व महाविद्यालयीन युवतींसाठी शहर पोलिसांनी लावलेल्या तक्रार पेट्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून २१ जुलै रोजी या तक्रारी पेट्या उघडल्यानंतर १२ तक्रारी प्राप्त झाल्या. मुलींना छेडणाºयांची अजिबात गय केली जाणार नसून पडताळणी केल्यानंतर या तक्रारींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती ठाणेदार यु. के. जाधव यांनी दिली. मुलींची छेड काढण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र बºयाचदा याबाबत तक्रार करण्यासाठी मुली समोर येत नाहीत. त्यामुळे टारगट मुलांची हिंमत वाढून छेडछाडीचे प्रकार वाढतात. मुलींना छेडणाºया टवाळखोरांना वठणीवर आणण्यासाठी ठाणेदार यु. के. जाधव यांनी मोहीम उघडली आहे. शहरातील शाळा, महाविद्यालये व शिकवणी वर्गांसमोर तक्रार पेट्या लावण्यात आल्या आहेत. शहरात जवळपास २० ते २२ लहान मोठे शाळा महाविद्यालय आहेत. याठिकाणी मुली व युवतींसाठी तक्रार पेट्या लावलेल्या आहेत. मुलींनी टाकलेल्या तक्रारींची चौकशी करुन त्यावर कारवाई करण्यात येते. शहर पोलिसांनी सुरु केलेल्या या उपक्रमामुळे छेडछाडीचे प्रकार थांबतील असा विश्वास ठाणेदारांनी व्यक्त केला.
१२ तक्रारी प्राप्त
शहरातील शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्गांसमोर लावलेल्या तक्रार पेट्यांमध्ये २१ जुलै रोजी १२ तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये प्रबोधन विद्यालय, उर्दू हायस्कूल प्रत्येकी दोन, शिवाजी हायस्कूल, प्रभात क्लासेस, एडेड हायस्कूल, लिंगाडे पॉलिटेक्निक, भारत विद्यालयाच्या तक्रारी पेटीतील प्रत्येकी एक व इतर एक अशा १२ तक्रारींचा समावेश आहे.