फळ पीकविमा योजनेस मान्यता
By admin | Published: October 30, 2014 11:05 PM2014-10-30T23:05:52+5:302014-10-30T23:34:25+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील द्राक्ष, संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू व केळी पिकांचा समावेश.
बुलडाणा : जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये फळ पीकविमा योजनेस प्रायोगिक तत्त्वावरील हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेस शासनाची मान्यता मिळाली आहे. त्यात द्राक्ष, संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू व केळीचा समावेश आहे.
पाऊस, तापमान, सापेक्ष आद्र्रता व वेगाचे वारे यापासून फळपिकांना निर्धारित केलेल्या कालावधीत शे तकर्यांना विमा संरक्षण देणे आणि आर्थिक सहाय्य देणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेमध्ये सहभागी होणार्या शेतकर्यांना विमा हप्त्यापोटी ५0 टक्के अनुदान देय राहणार आहे. विविध वित्तीय संस्थांकडे पीक कर्जासाठी अर्ज केलेल्या व ज्यांची अधिसुचित फळपिकांसाठी पीक कर्ज र्मयादा मंजूर आहे, अशा सर्व शेतकर्यांना ही योजना सक्तीची करण्यात आली आहे. द्राक्षपिकासाठी बुलडाणा, बोराखेडी, जळगाव जामोद, बावनबीर व सोनाळा महसूल मंडळांचा समावेश असून, सहा हजार ७५0 प्रती हेक्टरी विमा हप्ता भरणे आवश्यक आहे. या योजनेसाठी ३१ ऑ क्टोबर रोजी अंतिम मुदत आहे. संत्रा पिकासाठी डोणगाव, बिबी, अंजनी, सुलतानपूर, अडगाव, लाखनवाडा, सोनाळा, बावनबीर, शेंदुर्जन, साखरखेर्डा, अंढेरा या महसूल मंडळाचा समावेश असून, प्रति हेक्टरी २ हजार ७00 रुपये विमा हप्ता असून ३0 नोव्हेंबर अंतिम मुदत आहे. मोसंबी पिकासाठी सिंदखेडराजा, सोनोशी, किनगावराजा, दुसरबीड, मलकापूर, पांग्रा, शेंदुर्जन, साखरखेर्डा या महसूल मंडळाचा समावेश आहे. यासाठी प्रति हेक्टरी २ हजार ७00 रूपये विमा हप्ता भरणे आवश्यक असून, अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर आहे. डाळिंब पिकासाठी पेठ, चिखली, चांधई, बुलडाणा व धाड महसूल मंडळाचा समावेश असून, प्रतिहेक्टरी ४ हजार ५00 रूपये विमा हप्ता भरणे आवश्यक आहे. यासाठी ३१ ऑक्टोबर अंतिम तारीख आहे. पेरू पिकासाठी साखळी बु., चिखली, हातणी, चांधई या महसूल मंडळाचा समावेश असून, विमा हप्त्यासाठी १ हजार ३५0 रूपये प्रति हप्ता भरणे आवश्यक आहे. यासाठी अंतिम मुदत ३१ ऑ क्टोबर आहे. तर केळी पिकासाठी बुलडाणा, मोताळा, बोराखेडी, जळगाव, बावनबीर व सोनाळा महसूल मंडळाचा समावेश असून, विमा हप्ता प्रति हेक्टरी ४ हजार ५00 रूपये भरणे आवश्यक आहे. यासाठी अंतिम मुदत ३१ ऑ क्टोबर आहे.
शेतकर्यांनी अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व सहायक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.