वसुली पथकातील अभियंत्यास वीज ग्राहकांची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 12:59 AM2017-11-11T00:59:48+5:302017-11-11T01:00:23+5:30

खामगाव : थकीत बिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या येथील विद्युत वितरण  कंपनीच्या पथकातील अभियंत्यास ग्राहकाने मारहाण केल्याची घटना  गुरुवारी सायंकाळी घडली.

The recovery team of the electricity collector beat the power consumers | वसुली पथकातील अभियंत्यास वीज ग्राहकांची मारहाण

वसुली पथकातील अभियंत्यास वीज ग्राहकांची मारहाण

googlenewsNext
ठळक मुद्देगुन्हा दाखल : कर्मचार्‍यांची पोलीस ठाण्यात धडककर्मचार्‍यांनी दाखविले एकीचे बळ!

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : थकीत बिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या येथील विद्युत वितरण  कंपनीच्या पथकातील अभियंत्यास ग्राहकाने मारहाण केल्याची घटना  गुरुवारी सायंकाळी घडली. यावेळी मारहाणीच्या निषेधार्थ  सुमारे १00  अधिकारी-कर्मचार्‍यांच्या जमावाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धडक  दिली. याप्रकरणी मारहाण करणार्‍या ग्राहकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात  आला असून, महावितरणकडून त्याचा वीज पुरवठा खंडित करण्यात  आला आहे.
सध्या महावितरण कंपनीकडून खामगाव शहर व ग्रामीण परिसरात थकीत  विद्युत बिल वसुलीची विशेष धडक मोहीम सुरु आहे. यामध्ये विविध  क्षेत्रिय कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांचे पथक बनवून वसुली  करण्यात येत आहे. दरम्यान, येथील दाळफैल भागातील रहिवाशी राजू  सहारकर या ग्राहकाकडे मार्च २0१६ पासूनचे घरगुती वापराचे १७ हजार  रुपयांचे वीज बिल थकलेले असल्याने गुरुवारी सायंकाळी ५ वाजताच्या  सुमारास हे पथक सहारकर यांच्याकडे गेले. यावेळी सहारकर याने चिडून  जावून पथकातील शहर उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता  राजेश माहुरकर व फरशी वितरण केंद्राचे प्रभारी सहायक अभियंता  पुरुषोत्तम शित्रे यांना दमदाटी करीत शित्रे यांना मारहाण केली. याबाबत  माहिती मिळताच महावितरणचे सुमारे १00 अधिकारी, कर्मचारी एकत्र  येऊन त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला धडक दिली. यावेळी ठाणेदार  संतोष ताले यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. तर पुरुषोत्तम शित्रे यांनी  दिलेल्या तक्रारीवरून राजू सहारकर याच्याविरुद्ध भादंवि कलम ३५३,  ३२४, ५0४ अन्वये गुन्हा दाखल  केला. महावितरणच्या पथकाने रात्री      दाळफैलात जावून सहारकर याच्या घरचा विद्युत पुरवठा खंडित केला. 
 

Web Title: The recovery team of the electricity collector beat the power consumers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.