रिफाइंडमुळे वाढते चरबी, घाण्याच्या तेलाची मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:41 AM2021-08-18T04:41:34+5:302021-08-18T04:41:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: रिफाइंड तेलामुळे चरबी वाढत असल्याने आता लाकडी घाण्यावरील कच्च्या घाणीच्या तेलाचा वापर करण्याचे प्रमाण ...

Refined increased fat, increased demand for essential oils | रिफाइंडमुळे वाढते चरबी, घाण्याच्या तेलाची मागणी वाढली

रिफाइंडमुळे वाढते चरबी, घाण्याच्या तेलाची मागणी वाढली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा: रिफाइंड तेलामुळे चरबी वाढत असल्याने आता लाकडी घाण्यावरील कच्च्या घाणीच्या तेलाचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. या तेलात रसायनांचा व अग्नीचा वापर होत नसल्याने हे नैसर्गिक आहे. त्यामुळे अनेकांचा कल याकडे वाढल्याचे दिसत आहे.

तेल हा सर्वच घरांमध्ये स्वयंपाकातला महत्त्वाचा घटक आहे. पण आरोग्याचा विचार करता तेल अतिप्रमाणात खाणे, चुकीच्या पद्धतीने स्वयंपाकासाठी तेळ वापरणे, हॉटेलमधील तळलेले पदार्थ वारंवार खाणे, घट्ट आलेले तेल वापरणे, अधिक दिवसाचे घाणीचे तेल वापरणे या सगळ्याच गोष्टी अपायकारक ठरतात.

घाण्याच्या तेलाचा पर्याय

शहरात साधारण २० ते ३० वर्षांपूर्वी घाणीवरूनच तेल आणले जायचे. दरम्यानच्या काळात विविध कंपन्यांचे रिफाइंड तेल बाजारात आले. ते स्वस्त असल्याने घाणीच्या तेलाची मागणी घटली. त्यामुळे, अनेक घाण्या बंद पडल्या.

अतिवापर धाेकादायक

रिफाइंड तेल अजिबात घातक नाही. ते आहारातील समतोल राखते. मात्र अतिप्रमाणात तेलाचा वापर आहारात करणे घोक्याचेच आहे. घाणीच्या तेलामध्ये कोलेस्ट्रॉल अधिक असल्याने त्याचाही वापर मर्यादित हवा.

म्हणून वाढत आहेत हृदयरोगी

तेलाचा अतिवापर करणे आरोग्यासाठी घातकच आहे. अलीकडे घाणीच्या तेलाचा अधिक वापर करणारे हृदयरुग्ण वाढल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. बदलून तेलाचा आहारात वापर न करता एकच एक तेल सातत्याने वापरले जाते. त्यामुळे एकप्रकारचे घटक तेलातून मिळते. बदलती जीवनशेली, जंक फूड हेसुद्धा यामागील कारण आहे.

रसायनांचा वापर नसल्याने घाणीचे तेल उत्तमच आहे. मात्र, अतिवापर नकाे. रिफाइंड तेलाचा अतिवापर केल्याचे त्याचे दुष्परिणाम समाेर येतात. सध्या जीवनशैली बदलल्याने अनेकांना वजन वाढणे, चरबी वाढणे आदी त्रास जाणवत आहे. काेराेनाच्या काळात आहाराविषयी सर्वांनी जागरूक राहण्याची गरज आहे. पाैष्टिक आहाराबराेबरच तेलाचा वापर ताेलून मापून करण्याची गरज आहे.

गाैरव टाकसाळ, आहारतज्ज्ञ

Web Title: Refined increased fat, increased demand for essential oils

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.