खडकपूर्णाच्या पाण्यावरून प्रादेशिक वादाची ठिणगी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 04:21 PM2018-08-26T16:21:48+5:302018-08-26T16:24:27+5:30

बुलडाणा : मराठवाड्यातील गौताळा अभयारण्यातून उगम पावणार्या खडकपूर्णा नदीवर देऊळगाव मही नजीक असलेल्या संत चोखा सागराचे (खडकपूर्णा प्रकल्प) पाणी मराठवाड्यातील मंठा, परतूर शहरासाठी आरक्षीत करण्याच्या हालचाली पाहता विदर्भ-मराठवाडा अशी प्रादेशिक वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Regional controversy sparks on the water of Dam in buldhana | खडकपूर्णाच्या पाण्यावरून प्रादेशिक वादाची ठिणगी!

खडकपूर्णाच्या पाण्यावरून प्रादेशिक वादाची ठिणगी!

googlenewsNext
ठळक मुद्दे डॉ. रामप्रसाद शेळके यांनी पत्रकार परिषद घेऊन खडकपूर्णातील पाणी पळविण्याचा हा डाव असल्याचे वक्तव्य दोन दिवसापूर्वी केले होते.राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आरोग्यमंत्री डॉ. शिंगणे यांच्या नेतृत्त्वात बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांच्याकडे आक्षेप नोंदविण्यात येणार आहे.

- नीलेश जोशी

बुलडाणा : मराठवाड्यातील गौताळा अभयारण्यातून उगम पावणार्या खडकपूर्णा नदीवर देऊळगाव मही नजीक असलेल्या संत चोखा सागराचे (खडकपूर्णा प्रकल्प) पाणी मराठवाड्यातील मंठा, परतूर शहरासाठी आरक्षीत करण्याच्या हालचाली पाहता विदर्भ-मराठवाडा अशी प्रादेशिक वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कधी काळी याच प्रकल्पाच्या उंचीवरून मराठवाड्यात आंदोलने झाली होती. त्यानंतर आता या प्रकल्पातील पाणी हे मराठवाड्यातील उपरोक्त शहरास देण्याच्या हालचाली पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रामप्रसाद शेळके यांनी पत्रकार परिषद घेऊन खडकपूर्णातील पाणी पळविण्याचा हा डाव असल्याचे वक्तव्य दोन दिवसापूर्वी केले होते. त्यातच राष्ट्रवादीचे माजी आरोग्य मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनीही निवडणुका डोळ््यासमोर ठेऊन भाजपची ही चाल असल्याचे वक्तव्य केल्याने आगामी निवडणुकांचा काळ पाहता राष्ट्रवादी काँग्रेस हा मुद्दा उचलून धरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मराठवाड्यातील मंठा, आणि परतूर शहरासाठी पाणी आरक्षणाच्या दृष्टीने खडकपूर्णा लगतच्या बुलडाणा जिल्ह्यातील असोला जहाँगीर, चिंचोली बामखेड, मेहुणा राजा, दगडवाडी, जवळखेड या ग्रामपंचायतींचे नाहरकत प्रमाणपत्र घेण्याचाही जालना जिल्ह्यातून थेट प्रयत्न झाल्याचा ठपका डॉ. शेळके यांनी ठेवला आहे. असे असताना मात्र खडकपूर्णा प्रकल्पावरील अधिकारी मात्र ही बाब नाकारत आहेत. त्यामुळे नेमका प्रकार काय? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. मुळात १६० दलघमी साठवण क्षमता असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पातील २५ दलघमी पाणी हे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफ्राबाद या शहरांसाठी सहा दलघमी, बुलडाणा शहरासाठी ९.५९ दलघमी, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा आणि एमआयडीसीसाठी सहा दलघमी आणि काही गावे मिळून असे जवळपास २५ दलघमी आरक्षीत करण्यात आलेले आहे. त्यात नव्याने मंठा आणि परतूरचा समावेश झाल्यास खडकपूर्णा प्रकल्पावरील दगडवाडी, निमगाव आणि नारायणखेड उपसा सिंचन योजनांचे भवितव्य काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोबतच मंठा आणि परतूरचा विचार करता लोअर दुधना प्रकल्पावरून या शहरांची पाणी समस्या सुटण्यासारखी आहे. परतूर लगत या प्रकल्पाचे बॅक वाटर येते. त्यामुळे खडकपूर्णातून या शहरांसाठी पिण्याच्या पाण्याचे प्रयोजन काय? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. रामप्रसाद शेळके यांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला. जिल्हाधिकार्यांकडे आक्षेप नोंदवणार खडकपूर्णातून मंठा आणि परतूर शहरासाठी पाणी आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आरोग्यमंत्री डॉ. शिंगणे यांच्या नेतृत्त्वात बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांच्याकडे आक्षेप नोंदविण्यात येणार आहे. त्या उपरही याबाबत काही हालचाल न झाल्यास थेट न्यायालयात दाद मागण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची असल्याचे संकेत डॉ. शेळके यांनी दिले. दुसरीकडे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात याच पाणी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस ‘रुम्हणे’ मोर्चाही काढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. उंची वाढविण्याचा प्रस्ताव बारगळला गेल्या सहा वर्षापासून खडकपूर्णा प्रकल्पाची उंची ५० सेमीने वाढविण्याच्या प्रस्तावाचे गुर्हाळ चालू होते. ‘मेरी’कडे तसा प्रस्तावही पाठविण्यात आला होता. ३० सेमीने उंची वाढविल्यास प्रकल्पातील जलसाठा दहा दलघमीने वाढणार होता. मात्र हा उंची वाढविण्याचा प्रस्तावही बारगळला आहे.

Web Title: Regional controversy sparks on the water of Dam in buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.