आरटीईसाठी जिल्ह्यातील २०० शाळांची नाेंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:05 AM2021-02-06T05:05:18+5:302021-02-06T05:05:18+5:30
१० फेब्रुवारीपर्यंत करता येणार नाेंदणी : २३० शाळांची नाेंदणी हाेण्याची शक्यता बुलडाणा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गंत २५ टक्के माेफत ...
१० फेब्रुवारीपर्यंत करता येणार नाेंदणी : २३० शाळांची नाेंदणी हाेण्याची शक्यता
बुलडाणा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गंत २५ टक्के माेफत प्रवेश देण्यात येतो. त्यासाठी शाळांची नाेंदणी सुरू झाली असून १० फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. ५ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील २०० शाळांनी नाेंदणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गंत मागासवर्गीय, दिव्यांग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत क्षमतेच्या २५ टक्के माेफत प्रवेश देण्यात येताे. त्यासाठी दरवर्षी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. गतवर्षीच्या प्रवेशाचा गाेंधळ सुरू असतानाच यावर्षी माेफत प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार शाळांची नाेंदणी सध्या सुरू आहे. ५ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील २०० शाळांनी नाेंदणी केली आहे. शाळांच्या नाेंदणीसाठी १० फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी शाळांची संख्या वाढण्याचा अंदाज शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.
गेल्यावर्षी जिल्ह्यातील २२० शाळांनी नाेंदणी केली हाेती. तसेच काेराेनामुळे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया रखडली हाेती. वारंवार मुदतवाढ दिल्यानंतरही अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश शिल्लक राहिले हाेते. यावर्षी शाळा नाेंदणीनंतर ही प्रक्रिया सुरू झाली आहे. १० फेब्रुवारीपर्यंत मुदत असल्याने आणखी २३० शाळांची नाेंदणी हाेण्याचा अंदाज शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.
आतापर्यंत शाळांची नाेंदणी
२००
शाळांची नाेंदणी हाेण्याची शक्यता
२३०
शाळा नाेंदणीची अंतिम मुदत
१० फेब्रुवारी