बुलडाणा जिल्हय़ात प्रजासत्ताकदिनी ‘ई-नाम’साठी होणार शेतकर्यांची नोंदणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 12:22 AM2018-01-26T00:22:56+5:302018-01-26T00:24:17+5:30
चिखली : चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीव्दारे प्रजासत्ताक दिनानिमित्त होणार्या ग्रामसभांमध्ये ई-नाम (इलेक्ट्रॅानिक नॅशनल अँग्रीकल्चर मार्केट) योजनेबाबत जनजागृती करण्याबरोबर शेतकर्यांची ई-नाम पोर्टलवर नोंदणी केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीव्दारे प्रजासत्ताक दिनानिमित्त होणार्या ग्रामसभांमध्ये ई-नाम (इलेक्ट्रॅानिक नॅशनल अँग्रीकल्चर मार्केट) योजनेबाबत जनजागृती करण्याबरोबर शेतकर्यांची ई-नाम पोर्टलवर नोंदणी केली जाणार आहे.
शेतमाल विक्री व्यवस्थेमधील पारंपारीक पद्धती बंद करून संगणकीकृत आणि ऑनलाइन लिलावाद्वारे व्यवहार करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय कृषी बाजाराची संकल्पना प्रत्यक्षात आणली असून, त्यासाठी ई-नाम (इलेक्ट्रॅानिक नॅशनल अँग्रीकल्चर मार्केट) चे एक व्यापार पोर्टल निर्माण करण्यात आले आहे. याद्वारे देशातील बाजार समित्या व त्यांचे व्यवहार इंटरनेटद्वारे राष्ट्रीय बाजारपेठेशी जोडण्यात आलेले आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचा या योजनेत समावेश करण्यात आला असून यानुषंगाने ३0 लाख रूपयांचा निधी देखील मंजूर झालेला आहे. त्यानुसार बाजार समितीत आवकाची नोंद संगणकावर केली जात आहे. समित्यांमधील लिलाव, शेतीमालाची शेतकर्यांना दिली जाणारी पट्टी यामध्ये पारदर्शकता निर्माण झाली आहे. तसेच सर्व लिलाव, शेतमालाची नोंदणी, पट्टी खात्यावर जमा करणे आदी बाबी ई-व्यवहारांद्वारे सुरू झाल्या असून राष्ट्रीय स्तरावरील ई-बाजारामुळे जास्तीत जास्त व्यापारी या लिलावात सहभागी होणार असून यामुळे स्पर्धा निर्माण होवून शेतकर्यांना शेतमालाचा योग्य मोबदला मिळण्यास मदत होणार आहे. तथापी शेतमालाच्या विक्रीनंतर शेतकर्यांच्या बँक खात्यात थेट पैसे त्याच दिवशी जमा करण्यासाठी ई-पेमेंटची सुविधा देखील याअंतर्गत आहे. दरम्यान तालुक्यात प्रामुख्याने ग्रामीण भागातून शेतकरी बाजार समितीमध्ये येत असल्याने व त्यांना या योजनेचे फायदे माहीत होणे आवश्यक असल्याने प्रजासत्ताक दिनानिमित्त होणार्या ग्रामसभांमध्ये त्याविषयी माहिती व मार्गदर्शन केले जाणार असून शेतकर्यांची नोंदणी सुध्दा करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने शेतकर्यांनी आधार, बँक खाते क्रमांक आदी माहितीसह २६ जानेवारी रोजी ग्रामसभांना उपस्थित रहावे व या योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन बाजार समिती सभापती डॉ.सत्येंद्र भुसारी, सचिव अजय मिरकड यांनी केले.