वनगावांचे पुनर्वसन रखडले

By admin | Published: September 25, 2015 12:08 AM2015-09-25T00:08:40+5:302015-09-25T00:08:40+5:30

देव्हारी ग्रामस्थांची समस्या; रात्री दहानंतर बोथा मार्गही बंद.

Rehabilitation of forests | वनगावांचे पुनर्वसन रखडले

वनगावांचे पुनर्वसन रखडले

Next

नीलेश जोशी / खामगाव : चार जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यातील बफर झोनमध्ये येत असलेल्या देव्हारी गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे अभयारण्यातून रात्रीची वाहतूक बंद करण्यात आली आहे; मात्र अभयारण्याच्या अंतर्गत भागात वसलेल्या या गावाच्या पुनर्वसनाची अद्याप हालचाल नाही. दुसरीकडे अंबाबरवा अभयारण्यातील गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढण्यात आला असला तरी ज्ञानगंगामधील देव्हारी गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरी आहे. दोन वनपरीक्षेत्रात तथा चार तालुक्यांच्या सीमावर्ती भागात २0५.११ चौरस किमीचा ज्ञानगंगा अभयारण्याचा विस्तार आहे. या अभयारण्यांतर्गतच्या १६ किलोमीटर लांबीच्या राज्य मार्गावर गेल्या दोन वर्षात दोन गर्भवती मादी बिबट ठार झाल्याने या अभयारण्यातील वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानुषंगाने जानेवारी २0१४ मध्ये अमरावतीचे मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) डॉ. दिनेश त्यागी यांनी या अभयारण्याची पाहणी केली होती. सोबतच वाहतूक बंदीच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने बोथा व वरवंट येथील नाक्यांची पाहणी केली होती. त्यानंतर गेल्या दोन महिन्यापूर्वी अभयारण्यातून गेलेल्या बुलडाणा- खामगाव मार्गावरील १६ किमीच्या राज्य मार्गावरील वाहतूक रात्रीच्यावेळी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा बंदीचा प्रस्ताव अमलात येण्यापूर्वीही दीड महिन्याअगोदरही त्यांनी अभयारण्यास भेट दिली होती. आता या मार्गावरील रात्रीची वाहतूक बंद करण्यात आली आहे; मात्र अभयारण्याच्या बफर झोनमध्ये असलेल्या देव्हारी गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मध्यंतरी झालेल्या ग्रामस्थांच्या सभेत वन्यजीव विभागाने १८ वर्षांवरील प्रती व्यक्ती दहा लाख रुपयांप्रमाणे मावेजा देऊन ग्रामस्थांनी त्यांचे व्यक्तिगतस्तरावर पुनर्वसन करावे, असे सुचवले होते; मात्र ग्रामस्थांना जागेच्या बदल्यात जागा हवी असल्याने हा प्रश्न सध्या अधांतरी आहे.

Web Title: Rehabilitation of forests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.