सिंचन विहीर खोदण्याचे निर्बंध शिथिल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:24 AM2021-07-15T04:24:02+5:302021-07-15T04:24:02+5:30
सिंदखेड राजा: तालुक्यात ५३ गावांमध्ये सिंचन विहीर सेमी क्रिटीकलचे कारण समोर करत विहीर खोदण्यास निर्बंध टाकण्यात आल्याने या गावातील ...
सिंदखेड राजा: तालुक्यात ५३ गावांमध्ये सिंचन विहीर सेमी क्रिटीकलचे कारण समोर करत विहीर खोदण्यास निर्बंध टाकण्यात आल्याने या गावातील लाभार्थी वंचित राहणार असल्यामुळे या लाभार्थ्यांना निर्बंध शिथिल करून विहीर खोदण्याची परवानगी देण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ऑल इंडिया पँथर सेनेचे सिंदखेडराजा तालुका अध्यक्ष रामदास कहाळे यांनी तहसीलदार सिंदखेड राजा यांना दिला आहे. जिल्हा परिषदेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत सिंचन विहीर खोदण्यासाठी अनुदान दिल्या जाते, यामुळे अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होते; परंतु यावर्षी वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विभागाने तालुक्यातील ५३ गावांमध्ये सेमी क्रिटीकलच्या आधारे विहीर खोदण्यासाठी निर्बंध टाकण्यात आल्याने अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांवर हा अन्याय असल्याचे निवेदनात म्हटले आहे़ हा निर्णय मागे घेऊन निर्बंध शिथिल करून विहीर खोदण्याची परवानगी देण्यात यावी, अन्यथा ऑल इंडिया पँथर सेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ऑल इंडिया पँथर सेनेचे तालुकाध्यक्ष रामदास कहाळे यांनी तहसीलदार सिंदखेड राजा यांना दिला आहे.