दिलासादायक : संग्रामपूर तालुक्यातील पाचही व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 08:34 PM2020-04-05T20:34:14+5:302020-04-05T20:35:56+5:30
दिलासादायक : संग्रामपूर तालुक्यातील पाचही व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह
Next
ref='https://www.lokmat.com/topics/sangrampur/'>संग्रामपूर - पंधरा दिवसापूर्वी दिल्लीहून परतलेल्या सहा जणांपैकी पाच जणांना शेगाव येथे तर एकाला अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. यामध्ये बोडखा, काकनवाडा, तामगाव येथील प्रत्येकी दोन दोन व्यक्तीचा समावेश आहे. या सहा पैकी शेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात 5 नागरिकांना क्वारंटाईन करून त्यांच्या घश्याचे नमुने औरंगाबाद येथे पाठवण्यात आले होते. त्या पाचही लोकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. तालुक्यातील बोडखा येथील दोन, तामगाव येथील दोन तर काकनवाडा येथील एकाचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी मयूर वाडे यांनी सांगितले आहे. तसेच अंजनगाव येथे क्वारंटाईन करण्यात आलेल्याची माहीती कळू शकली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. दिल्ली येथे कार्यक्रमांमध्ये हे सहा जण सहभागी होते. तालुका प्रशासनाने यातील पाच लोकांना शेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले होते. त्या पाचही जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने संग्रामपूर तालुक्यात सध्यातरी कोरोणा विषाणूची बाधीत एकही रुग्ण नसल्याचे तालुका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. संग्रामपूर तालुक्यात अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन ही आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)